RR vs GT: 35 चेंडूत 100 धावा ठोकल्या, 11 सिक्स, 7 फोर, 14 वर्षाच्या वैभवने गुजरातला रडवलं

14 वर्षाच्या वैभव सुर्यवंशीने 35 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. 101 धावा करून तो बाद झाला.त्याने 11 षटकारांचा पाऊस पाडला.

जाहिरात
Read Time: 2 mins
फोटो सौजन्य- आयपीएल

गुजरात टायटन्सने दिलेल्या 210 धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरूवात जोरदार झाली. वैभव सुर्यवंशी आणि यशस्वी जैसवाल हे गुजरातच्या गोलंदाजांवर तुटून पडले. वैभवने अवघ्या 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पन्नास धावा करताना त्याने सहा सिक्स ठोकले. 8 ओव्हर्समध्येच या दोघांनी शतकी सलामी देत राजस्थानची स्थिती मजबूत केली होती. दहा ओव्हर मध्ये 144 धावांचा टप्पा या दोघांनी गाठला. 14 वर्षाच्या वैभव सुर्यवंशीने 35 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. 101  धावा करून तो बाद झाला.त्याने 11 षटकारांचा पाऊस पाडला. तर सात चौकारही त्याने लगावले. त्यामुळे 16 ओव्हर्समध्येच राजस्थाने 212 धावा केल्या वैभवला यशस्वी जैसवालची साथ मिळाली. त्याने 40 चेंडूत 70 धावा केल्या. आठ विकेटने राजस्थानने गुजरातवर विजय मिळवला.   रियान परागनेही 15 चेंडूत 32 धावा केल्या. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा 

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात राजस्थानने टॉस जिंकला. टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यांचा हा निर्णय गुजरातने चुकीचा ठरवला. गुजरातने पहिल्यांदा बॅटींग करताना 20 ओव्हर्समध्ये जवळपास 209 धावा कुटल्या. राजस्थान समोर 210 धावांचे मोठे लक्ष ठेवले. त्यासाठी गुजरातचे चार फलंदाज बाद झाले. राजस्थानच्या एकाही बॉलरला प्रभावी बॉलिंग करता आली नाही. त्यामुळे गुजरातच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत दोनशे धावांचा पल्ला ही पार केला.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Shubman Gill : 'मी गेली 3 वर्ष..'. शुबमन गिलंनं सारा तेंडुलकरसह ब्रेकअपवर रहस्य उलगडलं, Video

गुजरातकडून कॅप्टन शुभमन गीलने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 50 चेंडूत 84 धावा ठोकल्या. त्यात चार षटकार आणि पाच चौकारांचा समावेश आहे. त्याला साई सुदर्शन आणि जोस बटलर यांची चांगली साथ मिळाली. साई सुदर्शनने 39 धावा केल्या. तर बटलरने 50 धावा केल्या. या पन्नास धावा अवघ्या 26 चेंडूत आल्या. शेवटच्या षटकामध्ये वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया यांनी फटकेबाजी करत धावसंख्या दोनशे पार नेली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - IPL 2025: पहलगाम हल्ल्यानंतर BCCI अलर्ट! IPLमध्ये सुरक्षा करणार 'हे' खतरनाक अस्त्र; एका नजरेत...

जोफ्रा आर्चर,महीश थीकशाना, युधवीर सिंग,संदीप शर्मा, रियान पराग, वानिंदु हसरंगा यांनी राजस्थानकडून गोलंदाजी केली. पण गुजरातच्या धावांवर त्यांना अंकुश ठेवता आला नाही. गुजरातच्या फलंदाजांनी सहज धावा करत गोलंदाजांची धुलाई केली. महीश थीकशाना दोन विकेट घेतल्या. तर  जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या. राजस्थान पुढे 210 धावांचे लक्ष ठेवण्यात आले. 

Advertisement