सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज सामना रंगला. तसं पाहात प्ले ऑफच्या शर्यतीतून हे दोन्ही संघ बाहेर पडले आहेत. त्यामुळे या सामन्याला तसं विशेष महत्व नव्हतं. पण हैदराबादच्या हेनरिक क्लासेनने आजचा दिवस क्रिकेट चाहत्यांसाठी खास करुन टाकला. त्याने आयपीएलच्या इतिहासातील तिसरं जलद शतक झळकावलं. त्याच्या या दणक्याने कोलकाताच्या बॉलर्सची दाणादाण उडाली. क्लासेनच्या फटकेबाजीमुळे हैदराबादने कोलकाता समोर विजयासाठी 278 धावांचे डोंगरा ऐवढे लक्ष ठेवले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हैदराबादने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी आक्रमक सुरूवात केली. अभिषेक शर्माने 16 चेंडूत 32 धावा केल्या. तर हेडने 40 चेंडूत 76 धावा केल्या. त्यात सहा सिक्स आणि सहा फोरचा समावेश होता. अभिषेक शर्मा आऊट झाल्यानंतर हेनरिक क्लासेनला बडती देण्यात आली. तो वन डाऊन मैदानात उतरला. त्यानंतर खेळात खरा रंग भरला.
ट्रेंडिंग बातमी - CSK vs GT: चेन्नईने सामना जिंकला, पण मनं जिंकली 'या' खेळाडूने
क्लासेन आधीपासूनच रंगात दिसत होता. त्याने कोलकात्याच्या फलंदाजांची पिस काढण्यास सुरूवात केली. त्याने अवघ्या 39 चेंडूत 105 धावा ठोकल्या. त्याने अवघ्या 37 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या फलंदाजीचे कोलकाताच्या गोलंदाजांकडे कोणतेही उत्तर नव्हते. त्याने आपल्या या आक्रमक खेळीत तब्बल 9 सिक्स मारले. तर 7 चौकार त्याने मारले. त्याचे हे आयपीएल मधले दुसरे शतक होते. शिवाय आयपीएलच्या इतिहासातील हे तिसरे जलद शतक ठरले. इशांत किशनने त्याला चांगली साथ दिली. त्याच्या या खेळी मुळे हैदराबादने 20 षटकात 278 धावा केल्या.
कोलकाताच्या एकाही गोलंदाजाचे हैदराबादच्या फलंदाजां समोर काहीच चालले नाही. सुनिल नारायण याने दोन फलंदाज बाद केले. पण त्यासाठी त्याला 42 धावा द्याव्या लागल्या. वरूण चक्रवती ही काही कमाल करू शकला नाही. त्याच्या 3 ओव्हर्समधून तब्बल 54 धावा चोपून काढल्या. आंद्रे रसेलला ही क्लासेनचा फटका बसला. त्याच्या दोन ओवर्समध्ये 34 धावा केल्या गेल्या. हा सामना खऱ्या अर्थाने क्लासेनने गाजवला. त्याने त्याच्या चाहत्यासाठी फलंदाजीची मेजवानीच पेश केली. त्यामुळे उपस्थितांनी त्याच्या फलंदाजीचा आनंद लुटला. तर दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना कोलकाताचा डाव गडगडला.