हैदराबादने दिलेल्या 232 धावांचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरूवात चांगली झाली. विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी सात ओव्हर्समध्ये 80 धावांची सलामी दिली. विराट कोहली 25 चेंडूत 43 धावा करून बाद झाला. फिल सॉल्टने अर्धशतक केले. तो 62 धावांवर बाद झाला. त्यानंतर मयंक अगरवाल ही लगेच तंबूत परतला. रतज पाटीदार ही फार काही करु शकला नाही. तो 18 धाव करुन बाद झाला. बंगळुरूचा डाव 189 धावात गडगडला. हैदराबादने 42 धावांने विजय मिळवला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रॉयल चॅलेज बंगळुरूने टॉस जिंकत हैदराबादला फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूने घेतलेला हा निर्णय हैदराबादच्या फलंदाजांनी फोल ठरवला. हैदराबादने वीस ओवर्समध्ये 231 धावा चोपून काढल्या. बंगळुरू समोर 232 धावांचे लक्ष्य ठेवले. हैदराबादकडून इशांत किशनने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने सर्वाधिक 94 धावा केल्या. त्याचे शतक थोडक्यात हुकले. त्याने 48 बॉलमध्ये 94 धावा केल्या. त्यात पाच षटकार आणि सात चौकारांचा समावेश होता.
इशांत किशनने एक बाजू लावून धरली होती. अन्य फलंदाजांनी छोट्या पण महत्वाच्या खेळी केल्या. त्यामुळे 231 धावा करता आल्या. अभिषेक शर्माने 17 चेंडूत 34 धावा केल्या. हेनरिक क्लासेन ने ही 13 चेंडूत 24 धावा ठोकल्या. अनिकेत वर्माने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 9 चेंडूत 26 धावा ठोकल्या. हैदराबादचे सहा फलंदाज बाद झाले. बंगळुरूच्या एकाही गोलंदाजाला प्रभावी बॉलिंग करता आली नाही. रोमारियो शेफर्ड याने दोन जणांना बाद केले. तर भुवनेश्वर कुमार, लुंगी न्गिदी, सुयाश शर्मा आणि कृणाल पांड्या यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.
ट्रेंडिंग बातमी - रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर आणखी एका दिग्गजानं केला टेस्ट क्रिकेटला अलविदा
बंगळुरूचे प्ले ऑफ मधील स्थान हे निश्चित आहे. पण ते पहिल्या चार मध्ये कितव्या क्रमांकावर राहाणार यासाठी हा सामना महत्वाचा होता. पहिल्या दोन क्रमांकावर बंगळुरू राहील्यास त्यांना दोन सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिल्यात त्या मॅच नॉक आऊट असणार आहेत.