IPL 2025 SRH Vs DC: आयपीएल 2025 चा 10 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो दिल्लीच्या गोलंदाजांनी चुकीचा सिद्ध केला. पहिल्याच षटकात अभिषेक शर्मा धावबाद झाला आणि त्यानंतर मिचेल स्टार्कने इशान किशन, नितीश कुमार रेड्डी आणि ट्रॅव्हिस हेड यांना स्वस्तात बाद करून हैदराबादचा टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल स्टार्कने पहिले षटक टाकले. षटकात सलग दोन चौकार मारल्यानंतर ट्रॅव्हिस हेडला पाचव्या चेंडूवर एक धाव घ्यायची होती पण समन्वयाच्या अभावामुळे अभिषेक शर्मा धावबाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला इशान किशन पुन्हा एकदा फ्लॉप झाला. तो फक्त २ धावा काढल्यानंतर मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर विकेटच्या मागे झेलबाद झाला.
सनरायझर्स हैदराबादचे स्फोटक फलंदाज मिशेल स्टार्कच्या कहरासमोर टिकू शकले नाहीत. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इशानला बाद केल्यानंतर, स्टार्कने त्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर नितीश कुमार रेड्डी (०) ला अक्षर पटेलकडून झेलबाद केले. चौथी विकेट 37 धावांवर ट्रॅव्हिस हेडच्या रूपात पडली, त्यालाही स्टार्कने बाद केले.
MI vs GT: सलग दुसऱ्या सामन्यात मुंबईचा पराभव, गुजरातचा विजय
अनिकेत वर्माने लाज राखली..
जर अनिकेत वर्माने 74 धावांची शानदार खेळी केली नसती तर सनरायझर्स हैदराबादने कदाचित फक्त 110- 120 धावाच केल्या असत्या. त्याने 41 चेंडूत 5 चौकारांसह 74 धावा केल्या. त्याने क्लासेनसोबत 77 धावांची भागीदारी केली. क्लासेनने 19 चेंडूत 32 धावा केल्या आणि मोहित शर्माने त्याला झेलबाद केले.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने असा झेल घेतला की तो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. स्टार्कने टाकलेल्या 18 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हर्षल पटेलने शॉट खेळला, अक्षर पटेलने डायव्ह करून झेल घेतला. या हंगामात आयपीएलमध्ये घेतलेला हा सर्वात कठीण झेल होता.
मिचेल स्टार्कची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी
वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सामन्यात 5 विकेट्स घेतल्या, आयपीएलमधील हा त्याचा पहिलाच पाच विकेट्सचा टप्पा आहे. त्याने 4 षटकांत 9.55 च्या इकॉनॉमीने 35 धावा दिल्या. त्याने ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, विलेम मुल्डर आणि हर्षल पटेल यांच्या विकेट घेतल्या.