IPL 2025: भल्याभल्यांना भिडणारा विराट.. भरमैदानात कुणाच्या पाया पडला? 'तो' VIDEO व्हायरल

IPL 2025 Virat Kohli Viral Video: . यापूर्वीही अनेकदा विराटने त्याच्या गुरुच्या भरमैदानात पाया पडल्याचे व्हिडिओ समोर आले होते, त्यानंतर त्याचे नेटकऱ्यांनी भरभरुन कौतुक केले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

IPL 2025: आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दमदार कामगिरी केली आहे. बंगळुरुच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत पॉईंट टेबलमध्ये पहिले स्थान मिळवले आहे. या दमदार विजयानंतर एकीकडे आरसीबीची टीम सेलिब्रेशनमध्ये व्यक्त असतानाच विराट कोहलीने केलेल्या एका कृतीची सध्या क्रीडाविश्वात चांगलीच चर्चा होत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

त्याचं झालं असं की दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यानंतर विराट कोहली मैदानावर सेलिब्रेशन करत असतानाच एका खास व्यक्तीच्या पाया पडतो. मैदानावर विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा त्याला भेटतात. त्यांना भेटताच सर्वप्रथम विराट त्यांच्या पाया पडतो. आरसीबीने आपल्या ट्वीटर अकाउंटवरुन हा सुंदर व्हिडिओ शेअर केला असून विराटच्या या कृतीचे चांगलेच कौतुक होत आहे. 

आरसीबीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये विराट कोहली त्याच्या बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्याकडे जातो आणि प्रथम त्यांचे पाय स्पर्श कर असल्याचे दिसत आहे. त्यानंतर दोघांमध्ये हास्य विनोदांसह चर्चा सुरु होते. यापूर्वीही अनेकदा विराटने त्याच्या गुरुच्या भरमैदानात पाया पडल्याचे व्हिडिओ समोर आले होते, त्यानंतर त्याचे नेटकऱ्यांनी भरभरुन कौतुक केले होते.

रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहलीने 47 चेंडूत  4 चौकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आरसीबीने 26 धावांत 3 विकेट गमावल्या, त्यानंतर दबावाखाली कोहलीने कृणाल पंड्यासह 119 धावांची भागीदारी केली आणि संघाला विजयाच्या जवळ नेले. विराट कोहलीने सलग तिसऱ्यांदा अर्धशतक झळकावले आहे.

Advertisement

नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : लक्ष्मणनं पुसले डोळे...द्रविडनं दिले धडे, 2 महान खेळाडूंनी कसा घडवला छोटा चॅम्पियन? )

आयपीएल 2016 नंतर विराट कोहलीने सलग तीन अर्धशतके झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. विराट कोहली सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने 10 सामन्यांमध्ये 443 धावा केल्या आहेत. पहिल्या क्रमांकावर गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सध्या 14 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. संघाने 10 पैकी 7 सामने जिंकले आहेत. आता आरसीबीचा पुढचा सामना 3मे रोजी त्यांच्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जशी आहे.