IPL 2026: मुंबईनंतर चॅम्पियन्स चेन्नईनेही गाशा गुंडाळला! गुजरातने लोळवलं, प्लेऑफसाठी 4 संघात मोठी शर्यत

CSK वरील विजयानंतर गुजरात टायटन्सचा नेट रन रेट सुधारला. त्यामुळे त्यांचा संघ आता संघ १८ गुणांसह (+०.६९५) गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

IPL 2026:  आयपीएल २०२६ चा ६६ वा सामना गुरुवारी (२१ मे) अहमदाबाद येथे गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (GT vs CSK) यांच्यात खेळला गेला. प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी CSK ला विजयाची गरज होती. मात्र त्यांना यात अपयश आले. संघाला ८९ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे ते स्पर्धेतून बाहेर पडले. CSK वरील विजयानंतर गुजरात टायटन्सचा नेट रन रेट सुधारला. त्यामुळे त्यांचा संघ आता संघ १८ गुणांसह (+०.६९५) गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

Gurnoor Brar : 4 वर्षात 1 आयपीएल सामना खेळलेल्या गुरनूर ब्रारची थेट टीम इंडियात निवड का झाली?

RCB अव्वल स्थानावर कायम

स्पर्धेच्या ६६ सामन्यांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर १८ गुणांसह (+१.०६५) पहिल्या स्थानावर कायम आहे. आरसीबी संघाने एकूण १३ सामने खेळले आहेत. दरम्यान, संघाने नऊ सामने जिंकले असून केवळ चार गमावले आहेत. सनरायझर्स हैदराबाद सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. ही बातमी लिहीपर्यंत, SRH ने स्पर्धेत एकूण १३ सामने खेळले आहेत. त्यांनी आठ सामने जिंकले असून पाच गमावले आहेत. संघाकडे १६ गुण आहेत.  राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत एकूण १३ सामने खेळले आहेत. त्यांनी सात सामने जिंकले असून सहा गमावले आहेत. संघाकडे १४ गुण आहेत (+०.०८३).

Advertisement

पंजाब, केकेआर आणि दिल्ली प्लेऑफच्या शर्यतीत

पंजाब, केकेआर आणि दिल्ली हे संघ देखील प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. पंजाब आणि केकेआरकडे प्रत्येकी १३ गुण असून त्यांचा एक सामना बाकी आहे. दिल्लीलाही एक छोटीशी संधी आहे. जर पंजाब आणि केकेआरला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना आधी राजस्थान रॉयल्सने आपला शेवटचा सामना गमावावा अशी प्रार्थना करावी लागेल. तरच त्यांचे प्लेऑफचे स्वप्न साकार होऊ शकते.

दरम्यान, प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडलेले तीन संघ म्हणजे लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स. सध्या, लखनौ गुणतालिकेत तळाशी आहे.

( नक्की वाचा : Team India : रोहित-हार्दिकचा समावेश, पण खेळण्यावर मोठी अट; अफगाणिस्तानविरुद्धच्या टीममध्ये मोठा 'ट्विस्ट' )