जाहिरात

Gurnoor Brar : 4 वर्षात 1 आयपीएल सामना खेळलेल्या गुरनूर ब्रारची थेट टीम इंडियात निवड का झाली?

Who is Gurnoor Brar : अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्ट आणि वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे. या टीममधील एका नावाबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. ते

Gurnoor Brar : 4 वर्षात 1 आयपीएल सामना खेळलेल्या गुरनूर ब्रारची थेट टीम इंडियात निवड का झाली?
Who is Gurnoor Brar : गुरनूर ब्रारच्या निवडीनं अनेकांना धक्का बसला आहे.
मुंबई:

Who is Gurnoor Brar : अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्ट आणि वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे. या टीममधील एका नावाबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. ते नाव म्हणजे गुरनूर ब्रार. पंजाबचा 25 वर्षांचा फास्ट बॉलरचा अफगाणिस्तान विरुद्धच्या टेस्ट आणि वन-डे टीममध्ये समावेश करण्यात आलाय. गुजरात टायटन्सनं ज्या खेळाडूला यंदाच्या आयपीएलमध्ये एकाही मॅचमध्ये संधी दिली नाही.तसंच जो चार आयपीएल सिझनमध्ये मिळून आजवर फक्त एक सामना खेळलाय. त्यावर अजित आगरकरच्या निवड समितीनं मोठा विश्वास दाखवला आहे. गुरुनूर ब्रार कोण आहे? त्याला टीम इंडियात थेट का संधी दिलीय हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

IPL मध्ये दुर्लक्षित पण टीम इंडियात संधी

गुरनूर ब्रारच्या निवडीनं अनेकांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे गुजरात टायटन्सनं त्याला 1.30 कोटी रुपये मोजून रिटेन केलं होतं, मात्र संपूर्ण सीजनमध्ये त्याला एकाही मॅचच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. ज्या खेळाडूला त्याच्या फ्रेंचायझीने संधी दिली नाही, त्याला निवड समितीने चक्क दोन्ही फॉरमॅटसाठी भारतीय टीममध्ये जागा दिली आहे. गुरनूरनं आतापर्यंत आयपीएलमध्ये फक्त 1 मॅच खेळली असून ती त्याने पंजाब किंग्सकडून खेळताना 3 ओव्हरमध्ये 42 रन दिले होते.

( नक्की वाचा : Team India : रोहित-हार्दिकचा समावेश, पण खेळण्यावर मोठी अट; अफगाणिस्तानविरुद्धच्या टीममध्ये मोठा 'ट्विस्ट' )

काय आहे सामर्थ्य?

गुरनूर ब्रार हा ताकदवान शरीरयष्टीचा खेळाडू आहे. त्याची 6 फूट 5 इंच उंची हेच त्याची सर्वात मोठी सामर्थ्य आहे. ज्यामुळे त्याला खेळपट्टीवरून चांगला बाऊन्स मिळतो. त्याने आतापर्यंत 18 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये 52 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने एकदा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. बॅटिंगमध्येही त्याने 15.20 च्या सरासरीने 304 रन केले आहेत. 2024-25 च्या रणजी ट्रॉफी सीजनमध्ये तो पंजाबचा सर्वात यशस्वी बॉलर ठरला होता.

नेट बॉलर ते टीम इंडियाचा प्रवास

गुरनूरचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्याने 2019 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी नेट बॉलर म्हणून सुरुवात केली होती. 2022 मध्ये पंजाबसाठी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. जम्मू-काश्मीरविरुद्ध त्याने खेळलेली 64 रनची जिद्दी खेळी आणि सिद्धार्थ कौलसोबतची 100 रनची पार्टनरशिप आजही सर्वांच्या लक्षात आहे. शेर-ए-पंजाब टी20 लीगमध्ये त्याने 11 मॅचेसमध्ये 22 विकेट्स घेऊन सर्वांचं लक्ष वेधलं होतं. याच कामगिरीच्या जोरावर त्याला भारत-ए टीममध्ये संधी मिळाली आणि आता तो मुख्य टीमचा भाग झाला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com