सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी आजच्या सामन्या दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीची जबरदस्त धुलाई केली. सलामीवीर अभिषेक शर्माने अवघ्या 68 चेंडूत नाबाद 135 धावांची स्फोटक खेळी साकारली. त्याच्या या खेळीत 10 चौकार आणि 10 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. अभिषेकच्या या झंझावातामुळे हैदराबादने निर्धारित 20 षटकात 2 बाद 242 धावांचा डोंगर उभा केला आहे. दिल्ली समोर हे मोठं आव्हान उभं करण्यात आलं. दिल्लीचे सर्वच बॉलर्स निष्प्रभ ठरले. एका ही गोलंदाजाला हैदराबादच्या बॅट्समनला रोखण्यात यश आलं नाही.
हैदराबादने दिलेल्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात चांगली झाली नाही. सलामीविर पथुम निसंका अवघ्या 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि नितीश राणा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. केएल राहुल 23 चेंडूत 37 धावा काढून बाद झाला. मात्र नितीश राणा याने एक बाजू लावून धरली होती. त्याने 30 चेंडूत 57 केल्या. पण तो ही बाद झाला. त्यानंतर आलेला डेव्हीड मिलर पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यामुळे दिल्लीची अवस्था 10 ओव्हर्समध्ये 107 वर 4 अशी झाली होती. हैदराबादने सामन्यावर घट्ट पकड मिळवली होती. समिर रिझवी आणि स्टब्ज यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दिल्लीच्या विकेट पडत गेल्या. अखेर दिल्ली 20 ओव्हर्समध्ये 195 धावा करता आल्या. दिल्लीचा 48 धावांनी पराभव झाला. दिल्लीच्या 8 विकेट पडल्या. हैदराबाद कडून मलिंगाने भेदक मारा करता चार विकेट्स घेतल्या.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या हैदराबादला ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माने चांगली सुरुवात करून दिली. हेडने 26 चेंडूत 37 धावा केल्या. त्याला अक्षर पटेलने बाद केले. त्याच्या खेळीत दोन सीक्स आणि दोन चौकारांचा समावेश होता. त्यानंतर आलेल्या कॅप्टन ईशान किशनने 13 चेंडूत 25 धावा केल्या. तो रन आऊट झाला. मात्र हेन्रिच क्लासेनने शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक पवित्रा घेत 13 चेंडूत नाबाद 37 धावा कुटल्या. दिल्लीकडून केवळ अक्षर पटेलला एक बळी मिळवता आला. दुसऱ्या बाजून अभिषेक शर्माने दिल्लीच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. त्याने आपल्या खेळीत 10 षटकारांची आतषबाजी केली.
( नक्की वाचा : IPL 2026: खर्च 118 कोटी आणि परफॉर्मन्स 'झिरो'! आयपीएल 2026 मधील महागड्या खेळाडूंचा असा झालाय 'गेम' )
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीच्या संघात नितीश राणाचे पुनरागमन झाले. तर हैदराबादने प्रफुल हिंगेच्या जागी मदुशंकाला संधी दिली आहे. गुणतालिकेत दोन्ही संघ 6 अंकांसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी होते. आज जो जिंकेल तो प्ले-ऑफच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकेल.