LSG vs CSK : मिचेल मार्शनं मैदान मारलं, लखनऊचा चेन्नईविरोधात 'सुपर' विजय, प्लेऑफचं गणित बिघडलं

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) चा 59 वा सामना आज शुक्रवारी लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये रंगला.चेन्नई सुपर किंग्जसाठी अतिशय महत्त्वाचा असलेल्या या सामन्यात युवा पेसर आकाश महाराज सिंग आणि लखनऊचा स्टार फलंदाज मिचेल मार्श चमकला.

जाहिरात
Read Time: 2 mins
IPL 2026, CSK vs LSG Scorecard

IPL 2026, LSG vs CSK :  इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) चा 59 वा सामना शुक्रवारी लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये रंगला. चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 187 धावा केल्या होत्या. या धावांचा लखनौने यशस्वी पाठलाग करत सामना जिंकला ज्यामुळे चेन्नईच्या प्लेऑफचे गणित बिघडले आहे. लखनौने वीस चेंडू शिल्लक असतानाच सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. 

चेन्नई सुपर किंग्जसाठी अतिशय महत्त्वाचा असलेल्या या सामन्यात युवा पेसर आकाश महाराज सिंग आणि लखनऊचा स्टार फलंदाज मिचेल मार्श चमकला.या हंगामातील पहिला सामना खेळणारा आकाश सिंगने चमकदार कामगिरी करण्याचा ठाम निर्धारच केला होता.कारण आकाशने विकेट्स घेतल्यानंतर ज्या प्रकारे सेलिब्रेशन केलं,ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. डावखुरा वेगवान गोलंदाज आकाशने चेन्नईसाठी पॉवर प्ले मध्ये एकापाठोपाठ एक विकेट्स घेतल्या. आकाशने 4 षटकांमध्ये 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. 

Advertisement

आकाशने भेदक गोलंदाजी करून लखनऊच्या फलंदाजांची दांडी गुल केली. या डावखुऱ्या गोलंदाजाने कर्णधार गायकवाड,संजू सॅमसन आणि आक्रमक फलंदाज उर्वित पटेलला बाद केलं.आकाशकडे जरी सीम आणि स्विंग नसेल, पण त्याच्या गोलंदाजीवर मोठे फटके मारणे सोपं नाहीय.कर्णधार गायकवाड आणि उर्विल पटेल पुल खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाले. 

नक्की वाचा >> Vardha Crime: भारतीय सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने कनिष्ठ अधिकाऱ्याला गोळी घातली, पुढे घडलं असं काही..

राजस्थानकडून खेळतो देशांतर्गत क्रिकेट

वयाच्या 35 व्या वर्षात खेळणारा आकाश महाराज सिंग देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थानसाठी खेळतो. डावखुऱ्या गोलंदाजाने 15 फर्स्ट क्लास सामन्यात 27 विकेट्स घेतल्या आहेत. तर 14 लिस्ट सामन्यांमध्ये 17 आणि 20 टी-20 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने 29 सामन्यांमध्ये 22 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने कमी वयातच वर्ष 2021 मध्ये राजस्थानसाठी करिअरला सुरुवात केली. या सीजमध्ये आकाश फक्त एकच सामना खेळला. त्याने 40 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर वर्ष 2023 मध्ये आकाशला चेन्नईने दुखापतग्रस्त खेळाडूच्या रिप्लेसमेंटमध्ये घेतलं.

नक्की वाचा >> IPS Transfer: महाराष्ट्रातील 24 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, 'त्या' अधिकाऱ्यांचाही समावेश, पाहा यादी

यावर्षी आकाशने 6 सामन्यांमध्ये 9.89 च्या इकोनॉमी रन-रेटने 6 विकेट घेतल्या होत्या.2025 मध्ये लखनऊने आकाशला 30 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर घेतलं. मागील वर्षी आकाशने 3 सामन्यांमध्ये 4 विकेट्स घेतल्या. त्याने एकाच सामन्यात 30 धावांवर 2 विकेट घेण्याची कामगिरी केली. यावर्षी फ्रँचायजीने आकाशला रिटेन केलं. पण सामना तेव्हा खेळवला गेला, जेव्हा टीम प्ले ऑफ राऊंडमधून बाहेर झाली होती.