Rohit Sharma VIDEO: 'अरे मुंबईत राहतो..', रोहित शर्मा मराठीत बोलला; 'हास्यजत्रा'चे कलाकार भारावले

अलिकडेच रोहितने महाराष्ट्राची हास्यजत्राच्या कलाकारांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Rohit Sharma Meet Maharashtrachi Hasyajatra Team VIDEO:  टीम इंडियाचा माजी कर्णधार, धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा त्याच्या खेळीइतकाच साधेपणामुळे ओळखला जातो. मराठमोळा रोहित शर्मा यशाच्या शिखरावर असूनही त्याचे पाय मात्र जमिनीवर आहेत. रोहितच्या याच दिलदारपणामुळे तो देशभरातील क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. रोहितची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. अलिकडेच रोहितने महाराष्ट्राची हास्यजत्राच्या कलाकारांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

रोहित शर्माचा मराठी स्वॅग..

काही महिन्यापूर्वीच थेट तुमच्या घरातून या मराठी नाटकाचा शुभारंभ करण्यात आला. या नाटकामध्ये हास्यजत्रामधील कलाकार, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, भाग्यश्री मिलींद, ओंकार राऊत, भक्ती देसाई या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सर्वांनी नुकतीच हिटमॅन रोहित शर्माची भेट घेतली. या भेटीत रोहित शर्माने थेट मराठीतून संवाद साधला अन् हास्यजत्राचे कलाकार भारावून गेले. 

Gautami Patil: "ओंकाररावांचं नाव घेते..."; गौतमी-ओंकारचं जमलं? काय आहे गच्ची कनेक्शन?

अभिनेते प्रसाद खांडेकरने रोहित शर्मासोबतच्या या भेटीचा व्हिडिओ आपल्या इन्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यावेळी रोहित शर्माने आपल्याशी मराठीमध्ये संवाद साधल्याचे त्याने म्हटलं आहे. अरे मुंबईत राहतो मी ..मुंबईत राहायचं म्हणजे मराठी बोलता आलंच पाहिजे, असं म्हणत हिटमॅनने आपला मराठीबाणा दाखवला. त्याच्या या भेटीबाबत अभिनेता प्रसाद खांडेकरने खास पोस्ट केली आहे. 

Advertisement

काय आहे अभिनेता प्रसाद खांडेकरची पोस्ट?

थेट तुमच्या घरातून टीमची ग्रेट भेट रोहित शर्मा
रोहित - अरे नमस्कार नमस्कार काढुया ना फोटो या या 
नम्रता- खुप भारी वाटतय तुम्ही मराठी बोलताय
रोहित - अरे मुंबईत राहतो मी ..मुंबईत राहायचं म्हणजे मराठी बोलता आलंच पाहिजे 
खुप भारी मराठमोळ्या रोहित भाय
मनःपूर्वक धन्यवाद ह्या कायम लक्षात राहणाऱ्या दिवसाबद्दल .. श्री अजय देसाई सर आणि किशोर लाड सर आणि आमची लाडकी वर्षा हडकर

VIDEO: 'मला नॉमिनेट करतो, तुझ्या आईची..', आयुष अन् ओमकार राऊतमध्ये हाणामारी? 

दरम्यान, रोहितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. रोहितचा हाच साधेपणा मनाला भावतो, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तर रोहित शर्मा इतकं छान मराठी बोलतो, याला म्हणतात खरा मुंबईकर. असं म्हणत काही युजर्सनी त्याच्या मराठी स्वॅगचे कौतुक केले आहे. 

Advertisement