MI vs GT: गुजरातने मुंबई समोर ठेवले 197 धावांचे टार्गेट, आता रोहितवर सर्वांची नजर

मुंबईकडून हार्दिक पांड्याने चार षटकात 29 धावा देत दोन जणांना बाद केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

गुजरात टायटन्स कडून साई सुदर्शन याने शानदार बॅटींग केली. त्याने सर्वाधिक धावा करताना अर्ध शतकही झळकावले. त्याने 41 चेंडूत 63 धावा केल्या. त्यात त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. त्याला ट्रेंट बोल्ड याने बाद केले. सुदर्शनच्या खेळी मुळे गुजरातला वीस षटकात 196 धावा करता आल्या.  गुजरातने 8 विकेटच्या मोबदल्यात 196 धावा केल्या. मुंबईला आता धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्मावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. शिवाय हार्दिक पांड्याही फलंदाजीत काय करतो या बाबत उत्सुकता आहे. गोलंदाजीत त्याने आपली छाप पाडत दोन फलंदाज बाद केले होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएलचा सामना रंगत आहे. मुंबईचा कर्णधार हार्दीक पांड्याने नाणेफेक जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेत गुजरातला बॅटींगसाठी पाचारण केले. गुजरातची सुरूवात चांगली झाली. साई सुदर्शन आणि कर्णधार शुबमन गिल यांनी आठ ओव्हर्समध्ये 78 धावांची सलामी दिली. शुभमन गिलला हार्दीक पांड्याने आऊट करत तंबूत परत पाठवलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - IPL 2025: पहिल्यांदाच संघात आले अन् 'विजय'श्री ठरले! 'या' 6 गेमचेंजर खेळाडूंनी रचला नवा इतिहास

शुबमन गिलने 27 चेंडूत 38 धावा केल्यात त्याच 4 चौकार आणि 1 षटकारचा समावेश आहे. त्यानंतर आलेल्या  जोस बटलर याने ही चांगली फलंदाजी करत  24 चेंडूत 39 धावा केल्या. त्यात त्याने 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याला मुजीब उर रहमान याने बाद केले. त्यानंतर आलेल्या शाहरूख खान याला जास्त वेळ खेळपट्टीवर राहाता आले नाही. तो अवघ्या 9 धावा करून बाद झाला. त्यालाही हार्दिक पांड्याने बाद केले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - IPL 2025 : T-20 क्रिकेटचा अनुभवही नाही, वडील रिक्षाचालक, केरळचा विघ्नेश कसा झाला मुंबईचा स्टार?

मुंबईकडून हार्दिक पांड्याने चार षटकात 29 धावा देत दोन जणांना बाद केले आहे. तर त्याला ट्रेंट बोल्ड, दिपक चाहर, मुजीब उर रहमान यांची चांगली साथ मिळाली. यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या सामन्या हार्दिक पंड्या खेळत आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर पहिल्या सामन्यात रोहित शर्मा अपयशी ठरला होता. त्याला खातेही खोलता आले नाही. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे ही सर्वांचे लक्ष असेल. 

Advertisement