जाहिरात

IPL 2025 : T-20 क्रिकेटचा अनुभवही नाही, वडील रिक्षाचालक, केरळचा विघ्नेश कसा झाला मुंबईचा स्टार?

Vignesh Puthur : विघ्नेश पुथुरला मुंबई इंडियन्सच्या संघात संधी देण्यात टॅलेंट स्काऊटचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातंय. सिनिअर पातळीवर टी-20 क्रिकेटचा कोणताही अनुभव विघ्नेशकडे नाही.

IPL 2025 : T-20 क्रिकेटचा अनुभवही नाही, वडील रिक्षाचालक, केरळचा विघ्नेश कसा झाला मुंबईचा स्टार?

Vignesh Puthur  : IPL च्या 18 व्या हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठी पराभवानेच झाली. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्यांदा फलंदाजी करताना 155 धावांपर्यंत मजल मारु शकला. विजयासाठी तुलनेने मिळालेलं सोपं आव्हान चेन्नईचा संघ सहज पूर्ण करेल असं वाटत होतं. अपेक्षेप्रमाणे चेन्नईने आपल्या डावाची आश्वासक सुरुवातही केली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

परंतु इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मुंबईच्या संघात पदार्पण केलेल्या केरळच्या 24 वर्षीय विघ्नेश पुथुरच्या फिरकी माऱ्यामुळे चेन्नईला विजयासाठी अखेरच्या षटकापर्यंत वाट पहावी लागली. 4 षटकांत 32 धावा देत विघ्नेशने 3 विकेट घेतल्या, परंतु आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. साहजिकच सामना संपल्यानंतर विघ्नेशच्या गोलंदाजीचं सर्वांनी कौतुक केलं. खुद्द महेंद्रसिंह धोनीनेही त्याला शाबासकीची थाप दिली. यानंतर साहजिकच सोशल मीडियावर विघ्नेश पुथुरची चर्चा सुरुवात झाली.

टी-20 क्रिकेटचा अनुभवही नाही तरीही विघ्नेश मुंबईपर्यंत कसा पोहचला?

विघ्नेश पुथुरला मुंबई इंडियन्सच्या संघात संधी देण्यात टॅलेंट स्काऊटचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातंय. सिनिअर पातळीवर टी-20 क्रिकेटचा कोणताही अनुभव विघ्नेशकडे नाही. परंतु केरळमध्ये एका स्थानिक क्लबकडून क्रिकेट खेळताना मुंबईच्या टॅलेंट स्काऊटची विघ्नेशवर नजर पडली. त्याच्या गोलंदाजीतलं कसब पाहून विघ्नेशला मुंबईत सर्वात आधी नेट बॉलर म्हणून संधी देण्यात आली. नोव्हेंबर महिन्यात विघ्नेशने मुंबई इंडियन्सच्या ट्रायल्सलाही हजेरी लावली होती.

ट्रेंडिंग बातमी - SRH Vs RR: रोमहर्षक लढतीत हैदराबादचा विजय, राजस्थानचा पराभव, दुबेची झुंझार खेळी व्यर्थ

त्याच्यातलं कसब पाहिल्यानंतर SA T-20 लिगमध्ये MI Cape Town संघाच्या  मदतीसाठी विघ्नेशला दक्षिण आफ्रिकेत नेट बॉलर म्हणून नेण्यात आलं. ज्यानंतर लिलावात विघ्नेशवर 30 लाखांची बोली लावत त्याला संघात घेण्यात आलं. विघ्नेश हा केरळच्या मध्यमवर्गीय घरातून येतो, त्याचे वडील केरळमध्ये रिक्षाचालक आहेत. अशा परिस्थितीत क्रिकेटच्या जोरावर विघ्नेशने मिळवलेलं यश हे कौतुकास्पद आहे.

पहिल्या सामन्यात विघ्नेशने केलेल्या माऱ्याचं मुंबई इंडियन्सचे बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांनी कौतुक केलं. "विघ्नेश सातत्याने बॉल स्पिन करु शकतो. आम्हाला जिथे टप्पा टाकणं अपेक्षित आहे तिकडे तो मारा करु शकतो असं त्याच्याकडे कसब आहे. त्यामुळे आम्ही त्याला संधी देण्याचं ठरवलं होतं. पण फक्त एवढीच बाब नाहीये, यासोबतच त्याच्याकडे गुगली टाकण्याचीही क्षमता आहे. त्यामुळे चांगल्या फलंदाजालाही तो अडचणीत आणू शकतो", असं म्हांब्रे म्हणाले.

ट्रेंडिंग बातमी - SRH Vs RR: 4,4,6,6.... हैदराबादमध्ये 'हेडचे तुफान! सर्वात जलद फिफ्टी ठोकली, जोफ्रा आर्चरची धुलाई

चेन्नईविरुद्ध सामन्यात विघ्नेशने फटकेबाजी करणाऱ्या चेन्नईचा कर्णधार ऋतुराजला बाद केलं. यानंतर धोकादायक ठरु पाहणाऱ्या शिवम दुबे आणि दिपक हुडालाही त्याने आपल्या जाळ्यात फसवलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: