IPL 2026 RR vs GT : अतितटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मारली बाजी, गुजरात टायटन्सचा निसटता पराभव

आयपीएल 2026 चा नववा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगला. राजस्थानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
Rajasthan Royals vs Gujrat Titans Match Update

GT vs RR Match Update : आयपीएल 2026 चा नववा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगला. राजस्थानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघाने गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. राजस्थानने 20 षटकांमध्ये 6 विकेट्स गमावून 210 धावांचा डोंगर रचला. त्यामुळे गुजरातसमोर 211 धावांचं तगडं आव्हान होतं. परंतु, या धावांचा टार्गेट गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्सनच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. शेवटच्या टप्प्यात कगिसो रबाडा आणि राशिद खानने राजस्थानला विजय मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु, राजस्थानचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेनं शेवटच्या षटकात भेदक गोलंदाजी करून राजस्थानला विजय मिळवून दिला. गुजरातच्या संघाने 20 षटकात 8 विकेट्स गमावून 204 धावाच केल्या.

राजस्थानसाठी सलामीचे फलंदाज यशस्वी जैस्वालने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर ध्रुव जुरेलने 42 चेंडूत 75 धावांची वादळी अर्धशतकी खेळी साकारली. तर वैभव सूर्यवंशीने 18 चेंडूत 31 धावा कुटल्या. तर गुजरात टायटन्ससाठी साई सुदर्शनने 44 चेंडूत 73 धावांची जबदरस्त अर्धशतकी खेळी केली. तर कुमार कुशाग्रा (18),जॉस बटलर 26, ग्लेन फिलिप्स (3),तसच वॉशिंग्टन सुंदर अवघ्या 4 धावांवर बाद झाला. 

Advertisement

नक्की वाचा >> Pune News: शिरुर तालुका हादरला, मध्यरात्री नवरा-बायकोनं केला हवेत गोळीबार, नंतर असं काही घडलं..

गुजरात टायटन्ससाठी गोलंदाज मोहम्मद सिराज,अशोक शर्मा, प्रसिद्ध कृष्णा आणि राशिद खानने प्रत्येकी एक विकेट घेतली. तर कगिसो रबाडाला दोन विकेट्स घेण्यात यश मिळालं. तर राजस्थानच्या संघासाठी रवी बिष्णोईने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे आणि रियान परागला प्रत्येकी एक विकेट मिळाली.


 

Topics mentioned in this article