जाहिरात

Pune News: शिरुर तालुका हादरला, मध्यरात्री नवरा-बायकोनं केला हवेत गोळीबार, नंतर असं काही घडलं..

शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे रात्री 11.30 च्या सुमारास हवेत गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी सेवानिवृत्त सैनिकासह तिघांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News: शिरुर तालुका हादरला, मध्यरात्री नवरा-बायकोनं केला हवेत गोळीबार, नंतर असं काही घडलं..
Pune Shirur Air Firing News
पुणे:

अविनाश पवार, प्रतिनिधी

Pune Shirur Gun Fire News :  शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे रात्री 11.30 च्या सुमारास हवेत गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी सेवानिवृत्त सैनिकासह तिघांवर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सविंदणे येथे राजेश लंघे यांच्या घरासमोर रात्री उशिरा हवेत गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

राजेश सावळेराम लंघे व स्वाती राजेश लंघे हे मुंबईहून मूळ गावी आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत सेवानिवृत्त सैनिक विजय ज्योतिबा कसेकर होते. त्यांनी त्यांचं परवानाधारक पिस्तुल लोड केलं आणि हवेत गोळीबार केला, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली. त्यानंतर राजेश लंघे व स्वाती लंघे यांनी कोणताही परवाना नसताना नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने हवेत गोळीबार केलं,अशीही माहिती पोलीस तपासात उघड झाली.

नक्की वाचा >> "...मी येतोय", पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनं स्वत:ला संपवलं, Instagram वर लिहिला शेवटचा मेसेज, काय घडलं?

सेवानिवृत्त सैनिकासह तिघांवर गुन्हा

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद ज्ञानदेव खटिंग (४०) यांनी फिर्याद दिली असून सेवानिवृत्त सैनिक विजय कसेकर (भांडुप,मुंबई), राजेश लंघे (४४) व स्वाती लंघे (दोघे सध्या रा.भांडुप,मुंबई, मूळ रा.सविंदणे, ता. शिरूर,जि.पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग पुढील तपास करत आहेत.

नक्की वाचा >> Ratnagiri News: जगबुडी नदीच्या पुलावर केमिकलचा टँकर पलटी, मुंबई-गोवा हायवेवरून जाणाऱ्या प्रवाशांनी सावध राहा

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

या प्रकरणात पोलिसांकडून गोपनीयता पाळली गेल्याची चर्चा असून फिर्यादी अधिकारीच तपास करत असल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.त्यामुळे या घटनेचा निष्पक्ष तपास होणार का,असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com