Ravichandran Ashwin: चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवली जात आहे. मात्र भारत आपले सामने दुबईमध्ये खेळणार आहे. ही स्पर्धा जिंकण्याची क्षमता दोन संघात असल्याचं माजी क्रिकेटपटू आर. अश्विन याने सांगितले. शिवाय तिसऱ्या असा एक संघ आहे जो सर्वांनाच चकीत करू शकतो असंही तो म्हणाला आहे. या स्पर्धेत उतरलेल्या सर्व टीम या मजबूत असल्याचंही अश्विन म्हणाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अश्विनच्या मते भारत आणि न्यूझीलंड हे चॅम्पियन्स ट्रॉफीचे प्रबळ दावेदार आहेत. हे दोन्ही संघ मजबूत आहेत. त्यामुळे या दोघां पैकी एक संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल असे मत अश्विनने व्यक्त केले आहे. मात्र ऑस्ट्रेलिया संघाचे प्रमुख खेळाडू हे सध्या जखमी आहेत. त्यामुळे ते संघा बाहेर आहेत. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया ही सर्वांना चकीत करू शकतो असंही अश्विन म्हणाला आहे. मोठ्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आपला खेळ उंचावण्यात पटाईत आहे असंही तो म्हणाले.
अश्विने आपल्या युट्यूब चॅनेलवर ही प्रतिक्रीया दिली आहे. भारताला दुबईत खेळण्याचा फायदा मिळेल. आपण आपल्या घरच्या मैदानावर खेळत आहोत अशी तिथली परिस्थिती आहे. शिवाय भारता विरुद्ध खेळणाऱ्या संघांनाही आपण भारतातच खेळत आहोत असं वाटेल. त्याचा थेट फायदा भारतीय संघाला होण्याची दाट शक्यता आहे असंही अश्विन म्हणाला. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी आधी भारताने ट्राई सिरीज खेळली पाहीजे होती. मात्र भारताने इंग्लंड विरुद्धच मालिका खेळली. भारताला त्याचा खरोखर फायदा झाला का असा प्रश्नही त्याने केला आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रीका हे संघ पाकिस्तानच्या परिस्थितीत खेळत आहेत. त्याचा फायदा त्यांना स्पर्धेत होवू शकतो असं ही तो म्हणाला.
दुबईत गेल्या वेळी भारत T20 वर्ल्डकप खेळला आहे. मात्र तिथला अनुभव तेवढा चांगला नाही. दुबईत टॉस जिंकणे फार महत्वाचे आहे. न्यूझीलंडच्या संघात ट्रेंट बोल्ड आणि टिम साउदी नाहीत. तरही न्यूझीलंडचा संघ भारता समोर आव्हान उभं करू शकतो. भारतानंतर न्यूझीलंड हा संघ ही स्पर्धा जिंकण्याची ताकद ठेवतो. त्यांच्याकडे दर्जेदार खेळाडू आहेत. त्यामुळे साऊदी आणि बोल्ड यांची त्यांना कमतरता वाटणार नाही.
न्यूझीलंडकडे माइकल ब्रेसवेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्या सारखे अनुभवी स्पिनर्स आहेत. त्यात कर्णधार मिचेल सेंटनर कोणत्या रणनितीने मैदानात उतरतो हे पहावे लागेल असं ही अश्विन म्हणाला. त्यामुळेच न्यूझीलंड ही या स्पर्धेतली एक मजबूत टीम आहे. पण आयसीसी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने नेहमीच चांगला खेळ केला आहे. ऑस्ट्रेलिया संघाची कमान स्टीव स्मिथच्या खांद्यावर देण्यात आली आहे. तो एक चांगला कर्णधार आहे असंही अश्विन म्हणाला. स्मिथ, हेड, मैक्सवेल आणि लाबुशेन हे संघाला विजय मिळवून देणारे खेळाडू आहेत. ऐन वेळेला ते आपला खेळ उंचावतात. कर्णधार पैट कमिंस आणि जोश हेजलवुड हे जखमी आहेत. मिचेल मार्श ही संघात नाही. अशा वेळी ऑस्ट्रेलिया समोर चांगला खेळ करण्याचे आव्हान असणार आहे.