![Chhattisgarh News : बिजापूरमध्ये 31 नक्षलवाद्यांचा खात्मा; यावर्षीची आकडेवारी 78 वर Chhattisgarh News : बिजापूरमध्ये 31 नक्षलवाद्यांचा खात्मा; यावर्षीची आकडेवारी 78 वर](https://c.ndtvimg.com/2025-02/sh3ovqto_naxal_625x300_09_February_25.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
छत्तीसगडमधील बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत 31 हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. तर दोन सैनिक शहीद झाले आहेत आणि 2 जखमी झाले. जखमींना घटनास्थळावरून बाहेर काढण्यासाठी जगदलपूरहून एमआय 17 हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बिजापूरमध्ये पंचायत निवडणुका होत आहेत. नक्षलवादी या निवडणुकांवर प्रभाव टाकू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नक्षलवादी आणि डीआरजी, एसटीएफ आणि बस्तर फायटरच्या सैनिकांमध्ये ही चकमक सुरू आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी सकाळी इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात सुरक्षा दलांचे एक पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक सुरू झाली.
![Latest and Breaking News on NDTV Latest and Breaking News on NDTV](https://c.ndtvimg.com/2025-02/30ummef_naxal_625x300_09_February_25.jpg)
(नक्की वाचा- Zero Click Malware : 'झिरो-क्लिक' मालवेयर म्हणजे काय? ऑनलाईन फसवणुकीसाठी कसा वापर होतेय?)
चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. चकमकीत जखमी झालेल्या दोन सैनिकांची प्रकृती स्थीर असून त्यांना उपचारांसाठी इतर रुग्णालयात नेण्यात येत आहे. त्याचबरोबर नक्षलवादी पळून जाऊ नयेत म्हणून चकमकीच्या ठिकाणी अतिरिक्त सैन्य पाठवण्यात आले आहे. परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू आहे.
छत्तीसगडमध्ये या वर्षातील ही सर्वात मोठी चकमक आहे. यावर्षी म्हणजेच जानेवारी 2025 पासून सुरक्षा दलांना 78 नक्षलवाद्यांना ठार केलं आहे.
(नक्की वाचा - Aarushi Pokhriyal Nishank : बॉलिवूड प्रेम पडलं महागात; माजी मुख्यमंत्र्यांच्या देखण्या मुलीला 4 कोटींचा चुना)
2025 मध्ये मारले गेलेले नक्षलवादी
4 जानेवारी - अबुझमाड जंगलात झालेल्या चकमकीत सैनिकांनी 5 नक्षलवाद्यांना ठार केले.
9 जानेवारी - सुकमा-बिजापूर सीमेवर झालेल्या चकमकीत 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान.
12 जानेवारी - विजापूर जिल्ह्यात 5 नक्षलवाद्यांना ठार मारले.
16 जानेवारी - छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील पुजारी कांकेर येथे 18 नक्षलवाद्यांचा खात्मा.
20-21 जानेवारी - गरियाबंद जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. यामध्ये, नक्षलवादी चालपतीसह 16 नक्षलवादी ठार मारले गेले.
9 फेब्रुवारी - विजापूरच्या जंगलात 31 नक्षलवादी ठार मारले गेले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world