IPL 2026, RCB vs LSG : आरसीबीची विजयी घौडदौड सुरुच, लखनऊलाही लोळवलं, चिन्नास्वामीत विजयी झेंडा फडकवला

आयपीएलचा 23 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायंएट्स यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगला. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
RCB vs LSG Match Result

RCB vs LSG Match Updates : आयपीएलचा 23 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायंएट्स यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगला. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या लखनऊ संघाची चांगलीच दाणादाण उडाली. बंगळुरुच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे लखनऊचा संघ 20 षटकांमध्ये 146 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर 147 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या फलंदाजांनी दमदार खेळी करत लखनऊचा पराभव केला. आरसीबीने 15.1 षटकात 5 विकेट्स गमावून 149 धावा केल्या आणि लखनऊ विरोधात मोठा विजय मिळवला.

विराट कोहलीचं एका धावेसाठी अर्धशतक हुकलं

आरसीबीसाठी सलामीला उतरलेल्या फिल सॉल्टने फक्त 7 धावा केल्या. तर विराट कोहलीने अप्रतिम फलंदाजी करत 34 चेंडूत 49 धावा केल्या. यामध्ये 6 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. देवदत्त पड्डीकलने 10, कर्णधार रजत पाटीदारने 27,जितेश शर्मा 23 धावा केल्या. आरसीबीसाठी प्रिन्स यादवने 3 विकेट घेतल्या. तर आवेश खानला 2 विकेट्स घेण्यात यश मिळालं.टीम डेव्हिड आणि शेफर्डने 14 धावांची नाबाद खेळी केली. 

Advertisement

नक्की वाचा >> CM Devendra Fadnavis: जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; राज्यातील सद्यस्थिती काय? A To Z माहिती वाचा

आरसीबीसाठी भुवनेश्वर कुमारने 3 विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. तर राशिख दरने 4 विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली. कृणाल पंड्याने 2 तर जोश हेजलवूडला एका विकेटवर समाधान मानावं लागलं. लखनऊ संघासाठी मिचेल मार्शने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तर आयुष बदोनीने 38 आणि मुकूल चौधरीने 28 चेंडूत 39 धावांची खेळी साकारली. लखनऊचे इतर सर्व फलंदाज स्वस्तार माघारी परतले. तर आरसीबीसाठी