Video : शांतपणे मटार सोलणाऱ्या गर्लफ्रेंडवर शिखर धवन संतापला, ओरडत ओरडत म्हणाला, "माझं आयुष्य बरबाद.."

धवन अनेकदा गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. नुकतच शिखरने त्याची गर्लफ्रेंड सोफी शाइनसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याची तुफान चर्चा रंगली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Shikhar Dhawan And Sophie Shine Video Viral

Shikhar Dhawan Video Viral :  क्रिकेटर शिखर धवन सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. मजेशीर रिल्स बनवून तो चाहत्यांचं जबरदस्त मनोरंजन करत असतो.त्यामुळे धवनच्या व्हिडीओंना खूप पसंती मिळते. धवन अनेकदा गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. नुकतच शिखरने त्याची गर्लफ्रेंड सोफी शाइनसोबतची एक मजेशीर रील शेअर केली आहे. चाहत्यांनी या रीलवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही केला आहे.शिखरही सर्वसामान्य लोकांसारखाच मटार खाऊन वैतागले आहे.त्याच्या घरीही रोज मटरच बनत असल्याने त्याने रागाच्या भरात हा व्हिडीओ बनवला आहे. 

मटार खाऊन शिखर धवनला आला कंटाळा, नंतर जे घडलं..

मटार खाऊन त्रस्त झालेल्या शिखर धवनने व्हिडीओ शेअर करत म्हटलंय की, "खरं सांगा,आज तुमच्या घरीही मटार बनवली आहे ना?"व्हिडिओमध्ये धवनची गर्लफ्रेंड सोफी सोफ्यावर बसून मटार सोलताना दिसते.त्यावेळी शिखर रागात म्हणतो, "कालही बनले होते मटार,आजही मटार बनवले आहेत!या व्हिडिओमध्ये धवन रागात जरी बोलत असला, तरी त्याचे हावभाव पाहून चाहत्यांनाही हसू आवरलं नाहीय.  

नक्की वाचा >> किंग खानसोबत 1 चित्रपट, 50000 कोटींची मालकीन, श्रीमंतीत जुही चावलालाही मागे टाकलं, 'ती' मराठी अभिनेत्री कोण?

चाहत्यांनी व्हिडीओवर केला मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव

शिखर धवनचा हा फनी व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी फनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका यूजरने म्हटलंय की, “गॉड गब्बर”.अन्य एकाने म्हटलंय, "मटारची भीती".तर अन्य एका चाहत्याने म्हटलंय की,“पाजी, तुम्ही कोणत्या लाईनमध्ये आला आहात?”. या व्हिडीओला हजारो लोकांनी लाईक केलं असून इंटरनेटवर एकच हशा पिकला आहे. 

Advertisement

शिखर धवन सोफीसोबत लवकरच बांधणार लग्नगाठ

शिखर धवन आणि त्याची प्रेयसी सोफी शाइन यांच्या नात्याबद्दल क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा आहे. दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. दोघेही कपल पुढच्या महिन्यात लग्न करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिखर धवन आणि सोफी शाइन फेब्रुवारी 2026 मध्ये लग्न करण्याची प्लॅनिंग करत आहेत.हा लग्नसोहळा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दिल्ली–एनसीआरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या लग्नाला क्रिकेट ते बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

नक्की वाचा >> 'धावत्या ट्रेनमध्ये WI-FI ची सुविधा का नाही?', ऑफिसच्या टेन्शनमुळे वैतागलेल्या प्रवाशाला मिळालं भन्नाट उत्तर