Indian Railway WiFi Facility Latest News : इंडियन रेल्वे ट्रेनमध्ये वाय-फाय (Wi‑Fi) सुविधा का देत नाही? असा प्रश्न काही वर्षांपूर्वी लोकसभेतही विचारला गेला होता.त्यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं.पण नुकतच एका प्रवाशाने ट्रेनमधील इंटरनेटच्या सुविधेबाबत विचारलेला प्रश्न सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी या प्रश्नावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारतीय रेल्वेचं नेटवर्क खूप मोठं आहे. भारतात 7300 पेक्षा जास्त रेल्वे स्थानके आहेत.भारतीय रेल्वेकडे 1 लाख 26 हजार किमी लांबीच्या मार्गांचे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध आहे.अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेला धावत्या गाड्यांमध्ये Wi‑Fi उपलब्ध करून देणे शक्य आहे का? रेल्वे असे करू शकते का? जाणून घ्या सविस्तर माहिती.
“अजून Wi‑Fi नाही, तरी लोक मोठ्या आवाजात रील पाहतात"
@Mysterious_Muffin380 यांनी r/indianrailways या रेडिट पेजवर एक प्रश्न विचारण्यात आला आहे. अखेर रेल्वे गाड्यांमध्ये Wi‑Fi सुविधा का उपलब्ध करून देत नाही? या प्रश्नावर प्रतिक्रिया देत एका यूजरने म्हटलंय की, “अजून Wi‑Fi नाही, तरी लोक मोठ्या आवाजात रील पाहतात. जर Wi‑Fi दिले तर काम करणाऱ्यांना नॉईस‑कॅन्सलेशन हेडफोन आणि इअरफोन लावावे लागतील.”अन्य एका यूजरने म्हटलं, "पूर्वी हावडा राजधानीमध्ये ही सुविधा उपलब्ध होती..कदाचित 2013 च्या आसपास.पासवर्ड PNR वरून मिळायचा.पण नंतर हा प्रकल्प बंद करण्यात आला कारण तो खूप महागडा ठरत होता.तसच इंटरनेटचा स्पीडही खूप कमी होता".
नक्की वाचा >> Dharashiv Crime: दीर-भावजयच्या अनैतिक संबंधांना अडसर ठरलेल्या 13 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, शेतात काय घडलं?
सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्धच नाही, असं नाही.वंदे भारत गाड्यांमध्ये रेल्वे Wi‑Fi वर इन्फोटेन्मेंटची सुविधा आहे.तसेच तेजस,राजधानी,शताब्दी आणि दुरांतो एक्स्प्रेससारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये इंटरनेट सुविधा सुरू करण्यात आली होती.परंतु,हे खूप खर्चिक होत असल्याने आता ही सेवा मर्यादित करण्यात आली आहे.

अतिरिक्त खर्चामुळे रेल्वेने घेतला मोठा निर्णय
द फाइनान्शियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, 2021 मध्ये लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लेखी स्वरूपात सांगितले होते की, पायलट प्रोजेक्टअंतर्गत इंडियन रेल्वेच्या हावडा राजधानी एक्सप्रेसमध्ये सॅटेलाइट कम्युनिकेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इंटरनेट सेवा देण्यात आली होती.रिपोर्ट्सनुसार,या तंत्रज्ञानाचा खर्च खूप जास्त येत होता.बँडविड्थ आणि अतिरिक्त खर्च यामुळे रेल्वेला ही सेवा पुरवणे महागडे पडत होते.
नक्की वाचा >> महिलांसाठी भारतातील सर्वात सुरक्षित अन् नोकरीसाठी चांगलं शहर कोणतं? पुणे-मुंबईसह टॉप-10 शहरांची लिस्ट वाचा
रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं होतं की, प्रवाशांसाठी उपलब्ध इंटरनेट बँडविड्थ पुरेशी नव्हती.म्हणूनच नॅशनल ट्रान्सपोर्टरने हा प्रोजेक्ट बंद करण्याचा निर्णय घेतला.सध्या धावत्या गाड्यांमध्ये Wi‑Fi आधारित इंटरनेट सेवा देण्यासाठी जेवढे खर्च-प्रभावी तंत्रज्ञान लागते,ते उपलब्ध नाही. दरम्यान, भारतीय रेल्वेच्या 6,000 पेक्षा जास्त स्टेशनांवर मोफत Wi‑Fi उपलब्ध आहे. प्रवासी RailTel च्या RailWire ब्रँडद्वारे ही सेवा वापरू शकतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world