भारतीय संघाला नवा कसोटी कर्णधार मिळाला आहे. शुभमन गिल (Shubman Gill India New Test Captain) भारताचा नवा कसोटी कर्णधार बनला आहे. गिल कर्णधार म्हणून इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला 5 कसोटी सामने खेळायचे आहेत. अशातच कर्णधार झाल्यावर गिलने प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात गिलने कर्णधार बनण्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. गिलने म्हटले आहे की, तो कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्यास खूप उत्सुक आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गिल म्हणाला की, "कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवणे ही एक 'मोठी जबाबदारी आहे'." 25 वर्षीय गिलने कसोटीत कधीही कर्णधारपद भूषवले नव्हते, परंतु त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो उपकर्णधार आहे. गिल म्हणाला, जेव्हा कोणी क्रिकेट खेळायला सुरुवात करतो, तेव्हा त्याला भारतासाठी खेळायचे असते. भारतासाठी क्रिकेट खेळणे हे त्याचे स्वप्न असते. फक्त भारतासाठी खेळणेच नाही, तर खूप दीर्घकाळ भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणे हे स्वप्न असते. मलाही खूप काळ कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. ही संधी मिळणे माझ्यासाठी अभिमानाची आणि मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे.
गिल कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवणारा 37 वा खेळाडू आहे. मन्सूर अली खान पटौदी, सचिन तेंडुलकर, कपिल देव आणि रवी शास्त्री यांच्यानंतर ही भूमिका निभावणारा तो पाचवा सर्वात तरुण खेळाडू आहे. कसोटी कर्णधार म्हणून गिल इंग्लड विरुद्ध पहिली मालिका खेळणार आहे. 20 जूनपासून सुरू पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.
गिलला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. गिलला मिळालेला संघ हा पुर्ण पणे नवा आहे. नव्या दमाचे खेळाडू या संघात आहे. गिल पर्वाची सुरूवात या मालिकेने होणार आहे. कोहली आणि रोहित व्यतिरिक्त, अश्विननेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे इंग्लंडचा दौरा हा गिलसाठी मोठी कठीण परिक्षाच असणार आहे. या मालिकेसाठी रोहित आणि कोहली हे अनेक वर्षानंतर संघात नसतील.