जाहिरात

Nashik News : वैष्णवी हगवणेसारखीच नाशिकमधील घटना, पैशांसाठी सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून भक्तीने संपवलं जीवन 

सासरच्या मंडळींकडून भक्तीचा छळ होत होता.  मंडळी वारंवार तिच्याकडे माहेरून पैसे घेऊन ये अशी मागणी करत शारीरिक व मानसिक छळ करत होते. 

Nashik News : वैष्णवी हगवणेसारखीच नाशिकमधील घटना, पैशांसाठी सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून भक्तीने संपवलं जीवन 

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. पुण्यातील हे प्रकरण ताजं असताना नाशिकमधूनही असाच एक प्रकार समोर आलं आहे. नाशिकच्या भक्ती गुजराथी या विवाहित महिलेला सासरच्या मंडळींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भक्तीचा पती अथर्व गुजराथी आणि सासरे योगेश गुजराथी या दोघांना गुजरातच्या नवसारीत नाशिक गुंडा विरोधी पथकाने बेड्या  ठोकल्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

18 मे रोजी भक्तीने राहत्या घरात फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सासरच्या मंडळींकडून भक्तीचा छळ होत होता.  मंडळी वारंवार तिच्याकडे माहेरून पैसे घेऊन ये अशी मागणी करत शारीरिक व मानसिक छळ करत होते. अशा आरोपानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात पती, सासरा व सासू विरोधात भक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी कालच भाजप आमदार चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली होती. 

हगवणे कुटुंबीयांच्या जवळचे IPS अधिकारी सुपेकरांवर अंजली दमानियांचा गंभीर आरोप, Audio Clip च ऐकवली

नक्की वाचा - हगवणे कुटुंबीयांच्या जवळचे IPS अधिकारी सुपेकरांवर अंजली दमानियांचा गंभीर आरोप, Audio Clip च ऐकवली

दरम्यान वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणात नवनवे खुलासे होत असून हगवणे पिता- पुत्रांचे काळे कारनामे उघडकीस येत आहेत. अशातच वैष्णवी हगवणेच्या मृत्यूप्रकरणी एक खळबळजक ट्वीस्ट आला आहे. वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या नसून खून झाल्याचा संशय पोलिसांच्या रिमांड कॉपीमधून व्यक्त करण्यात आला आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी या दोघांना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने या दोघांनाही 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी सादर केलेल्या रिमांड कॉपीमध्ये वैष्णवीचा खून झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com