हैदराबादने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना गुजरातची सुरूवात चांगली झाली नाही. साई सुदर्शन पाच धाव करून बाद झाला. तर त्यानंतर आलेल्या जोस बटलर याला तर खाते ही उघडता आले नाही. मात्र त्यानंतर कॅप्टन शुभमन गील आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी गुजरातचा डाव सावरला. शुभमन गीलने आपले अर्ध शतक पुर्ण केलं. पण वॉशिंग्टन सुंदरचे अर्ध शतक केवळ एका धावेने हुकले. तो 49 धावांवर बाद झाला. त्याने 29 चेंडूत 49 धावा केल्या. त्यात पाच चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. गुजरातने हैदराबादला दिलेले 152 धावांचे लक्ष 17 व्या षटकातच पूर्ण केले. शुभमन गीलने 61 धावांची खेळी केली. तर रुदरफर्ड याने धुवांधार बॅटींग करत 16 चेंडूत 35 धावा ठोकल्या. हैदराबादचा हा सलग चौथा पराभव झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गुजरात टायटन्सने हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकला. त्यांनी पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादची सुरूवात चांगली झाली नाही. संघाच्या नऊ धावा असताना ट्रॅव्हिस हेड हा अवघ्या 8 धाव करून बाद झाला. त्याला मोहम्मद शिराजने आऊट केले. अभिषेक शर्मालाही खेळपट्टीवर जास्त वेळ थांबता आले नाही. तोही 18 धावा करुन बाद झाला. हैदराबादच्या सलामीवीरांना मोहम्मद शिराजनेच बाद केले. हैदराबादकडून सर्वाधिक धावा या नितीश कुमार रेड्डी यांनी केल्या. पण त्याला दुसऱ्या बाजून योग्य साथ मिळाली नाही.
नितीशकुमार रेड्डी याने 34 चेंडूत 31 धावा केल्या. इशांत किशन आणि क्लासेन यांनी चांगली सुरूवात करूनही त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इशांत किशनने 14 चेंडूत 17 धावा केल्या. तर क्लासेनने 19 चेंडूत 27 धावांची खेळी केली. त्यात एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश आहे. कॅप्टन पॅट कमिन्सने शेवटच्या षटकांमध्ये जोरदार बॅटींग केली. त्याने अवघ्या नऊ चेंडूत 22 धावा केल्या. त्यामुळे हैदराबादला 20 षटकात 152 धावा करता आल्या.
गुजरातच्या बॉलर्सनी हैदराबादच्या फलंदाजांना पहिल्यापासून बांधून ठेवलं होतं. त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. गुजरातकडून मोहम्मद शिराजने कसून बॉलिंग करताना 4 विकेट घेत अवघ्या 17 धावा दिल्या. तर दुसऱ्या बाजून प्रसिद्ध कृष्णा आणि रविश्रीनिवासन यांनी त्याला चांगली साथ दिली. त्यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. गुजरातच्या तिखट माऱ्या पुढे हैदराबादला केवळ 152 धावा करता आल्या. त्यांचे 8 फलंदाज बाद झाले.