
IPL 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारा फिरकीपटून वरुण चक्रवर्ती सध्या चांगलाच चर्चेत आहे. आर्किटेक्ट ते क्रिकेटर असा संघर्षमय प्रवास केलेल्या वरुणचक्रवर्तीचा प्रवास प्रेरणादायी आहे. सध्या आयपीएलमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत आहे. एकीकडे आयपीएलचा रणसंग्राम सुरु असतानाच वरुण चक्रवर्तीने केलेल्या नव्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर अशी ओळख असलेला वरुण चक्रवती सध्या आयपीएलचे मैदान गाजवत आहे. आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळताना त्याने शानदार कामगिरी करत सहा विकेट्सही मिळवल्यात. दुसरीकडे तो त्याच्या आर्किटेक्टच्या कामातही लक्ष घालत आहे. त्याने पोस्ट केलेल्या नव्या फोटोंनी क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे.
IPL 2025: मुंबईच्या चाहत्यांसाठी खुशखबर! जसप्रीत बुमराह कमबॅकसाठी सज्ज; पाहा धमाकेदार VIDEO
काय आहे वरुण चक्रवर्तीची नवी पोस्ट?
शनिवारी, वरुण चक्रवर्तीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केलेत. ज्यामध्ये तो चेन्नईमधील एका बांधकामाच्या साईटची पाहणी करताना दिसत आहे. आर्किटेक्ट रिपोर्टिंग. पुन्हा माझ्या मूळ खेळाच्या मैदानात. एका क्लाएंट साईट भेटीवर.. असा कॅप्शन त्याने दिला आहे. वरुण चक्रवर्तीच्या या नव्या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.
दरम्यान, वरुणने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासाठी शानदार कामगिरी केली होती, ज्यामध्ये त्याने ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने आयपीएलमध्येही आपला फॉर्म कायम ठेवला आहे आणि या हंगामात केकेआरकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. वरुणने आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत.
Kajal Atpadkar: माणदेशी कन्येची यशस्वीझेप! आई-वडील ऊसतोड कामगार, लेकीची भारताच्या हॉकी संघात निवड
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world