जाहिरात

Ind vs USA : भारताचे फलंदाज मावळले, पण 'सूर्या' तळपला, वानखेडेत अमेरिकेला पराभवाची धूळ चारली

कर्णधार सूर्यकुमार यादवने दमदार अर्धशतकी खेळी करून भारताला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या अमेरिका संघाची मात्र पुरती दाणादाण उडाली.

Ind vs USA : भारताचे फलंदाज मावळले, पण 'सूर्या' तळपला, वानखेडेत अमेरिकेला पराभवाची धूळ चारली
ind vs usa match update
मुंबई:

IND vs USA Match Update :  भारत आणि श्रीलंकाने टी-20 वर्ल्डकप 2026 चं संयुक्त यजमानपद भूषवलं आहे. आज वानखेडे मैदानात भारत विरुद्ध अमेरिका यांच्यात वर्ल्डकपचा पहिला सामना रंगला. भारताने प्रथम फलंदाजी करून 20 षटकांमध्ये 9 विकेट्स गमावून 161 धावांपर्यंत मजल मारली. पॉवर प्ले मध्येच भारताचे टॉप ऑर्डरचे फलंदाज तंबूत परतले. परंत, कर्णधार सूर्यकुमार यादवने दमदार अर्धशतकी खेळी करून भारताला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या अमेरिका संघाची मात्र पुरती दाणादाण उडाली.

अमेरिका संघाने 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावून फक्त 132 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे भारताने टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात अमेरिका विरोधात दमदार विजय मिळवला. भारतासाठी मोहम्मद सिराजने 3 विकेट्स घेतले. तर अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. तर वरुण चक्रवर्तीला एका विकेटवर समाधान मानावं लागलं. 

नक्की वाचा >> Ind vs USA : भारताचे फलंदाज मावळले, पण 'सूर्या' तळपला, वानखेडेत अमेरिकेला पराभवाची धूळ चारली

भारताचा सलामीवीर फलंदाज इशान किशन 16 चेंडूत 20 धावांवर बाद झाला. तर स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे भारताच्या धावसंख्येला ब्रेक लागला. परंतु, मैदानात उतरलेल्या तिलक वर्माने सावध खेळी करून 16 चेंडूत 25 धावा कुटल्या. पण त्यानंतर आलेल्या सर्व फलंदाजांना धावांचा सूर गवसला नाही.

पण सूर्यकुमारने शेवटच्या षटकापर्यंत भारताची कमान सांभाळली. सूर्यकुमारने 49 चेंडूत 84 धावांची वादळी खेळी केली. यामध्ये 4 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश आहे.अमेरिकेचा गोलंदाज शॅडलेनं चार विकेट्स घेतल्या. तर अली खान, मोहम्मद मोहसिनला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. तर हरमित सिंगने 2 विकेट्स घेतल्या. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com