Ind vs Zim T20 World Cup 2026: 'हार्दिक' अभिनंदन! टार्गेट गाठताना झिम्बाब्वेची दाणादाण, भारताचा ऐतिहासिक विजय

भारत आणि झिम्बाब्वे यांच्या सुपर 8 चा सामना आज चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये रंगला. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला पराभवाची धूळ चारली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ind vs Zim T20 World Cup 2026 Match Result

India vs Zimbabwe LIVE Score, T20 World Cup 2026: भारत आणि झिम्बाब्वे यांच्या सुपर 8 चा सामना आज चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये रंगला. भारताने प्रथम फलंदाजी करून झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना धुव्वा उडवला. भारताने 20 षटकात 4 विकेट्स गमावून 256 धावांपर्यंत मजल मारली.भारताने विश्वचषकातील सर्वाधिक स्कोअर करून नव्या विश्व विक्रमाला गवसणी घातली आहे. झिम्बाब्वेनं 257 धावांचा तगडं आव्हान पेलण्याचा जोरदार प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या पदरी पराभवाची निराशाच पडली. झिम्बाब्वेनं 20 षटकांमध्ये 6 विकेट्स गमावून 184 धावा केल्या.

23 चेंडूत हार्दिक पंड्याने ठोकल्या नाबाद 50 धावा

भारताचे सलामीवर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने पॉवर प्ले मध्ये धावांचा पाऊस पाडला. संजू 24 धावांवर बाद झाला. पण अभिषेकने धावांचा धमाका सुरुच ठेवला. मागील चार सामन्यांमध्ये धावांचा सूर न गवसलेल्या अभिषेकने या सामन्यात 30 चेंडूत 55 धावा करत अर्धशतक झळकावलं. सूर्यकुमार यादव (33), इशान किशन (38),हार्दिक पंड्या (50) आणि तिलक वर्माने (44) नाबाद करून भारताला तगड्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं.

नक्की वाचा >> Akola News : अकोल्यातील मजुराच्या मुलीचं स्वप्न साकार, पहाटे 5 वाजता रनिंग, व्यायाम अन्..देशभरात होतंय कौतुक

त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेची मात्र दाणादाण उडाली. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 3, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेलन आणि शिवम दुबेनं प्रत्येकी एक विकेट घेतली. झिम्बाब्वेसाठी सलामीवीर फलंदाज ब्रायन बेनेटने 59 चेंडूत 97 धावांची तुफानी खेळी केली. त्याने षटकार आणि 8 चौकार ठोकले.त्यापाठोपाठ डाएन मेयर्सने 21 चेंडूत 31 धावांची सर्वाधिक खेळी केली.