दुबई: पुरुषांच्या 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा पराभव करत बांगलादेशने पुन्हा एकदा आशिया कप चषकावर आपले नाव कोरले. दुबई येथे झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेशच्या संघाने टीम इंडियाचा 59 धावांनी पराभव केला. बांगलादेशने सलग दुसऱ्या वर्षी आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले, दुसरीकडे भारतीय संघाचा नवव्यांदा विजेतेपद पटकावण्याचे स्वप्नही भंगले.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यामध्ये गोलंदाजांकडूनही चांगली कामगिरी पाहायला मिळाली. बांगलादेशचा डाव 198 धावांवर रोखण्यात भारतीय संघाला यश आले. भारताकडून युधाजित गुहा, चेतन शर्मा आणि हार्दिक राज यांनी २-२ विकेट घेतल्या. तर किरण चोरमले, केपी कार्तिकेय आणि आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. दुसरीकडे बांगलादेशकडून रिझान हसनने सर्वाधिक 47 धावा केल्या. मोहम्मद शिहाब जेम्सनेही 40 धावांचे योगदान दिले. फरीद हसननेही ३९ धावांची खेळी खेळली.
नक्की वाचा: '...तर तुमचं डोकं ठिकाणावर येईल', चंद्रशेखर बावनकुळेंची शरद पवारांवर खरमरीत टीका
१९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाला पहिला धक्का आयुष म्हात्रेच्या रूपाने 4 धावांवर बसला. यानंतर विकेट पडत राहिल्या, त्यामुळे भारतीय संघ सामन्यात पुनरागमन करू शकला नाही. या सामन्यात वैभव सूर्यवंशीही केवळ 9 धावा करू शकला. याशिवाय केपी कार्तिकेयने 21 धावा केल्या आणि सी आंद्रे सिद्धार्थही 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार मोहम्मद अमानने निश्चितच एकाकी खेळी खेळली, पण तोही संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही आणि भारतीय संघ अवघ्या 44.5 षटकांत 249 धावांत गडगडला.
बांगलादेश संघाने सलग दुसऱ्यांदा अंडर-19 आशिया चषकाचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. बांगलादेशचा संघ अंडर-19 आशिया चषकाच्या इतिहासातील दुसरा संघ ठरला आहे, ज्याने दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने 8 वेळा जेतेपद मिळवलेआहे. या दोन संघांव्यतिरिक्त, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने प्रत्येकी 1 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.