जाहिरात

'...तर तुमचं डोकं ठिकाणावर येईल', चंद्रशेखर बावनकुळेंची शरद पवारांवर खरमरीत टीका

शरद पवार यांच्या ईव्हीएमविरोधातील भूमिकेनंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत पलटवार केला आहे. 2014 पासूनची मतदानाची आकडेवारीच बावनकुळेंनी मांडली आहे.

'...तर तुमचं डोकं ठिकाणावर येईल', चंद्रशेखर बावनकुळेंची शरद पवारांवर खरमरीत टीका

सागर कुलकर्णी, मुंबई: सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गाव सध्या ईव्हीएमविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात चर्चेत आहे. या मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भेट देत ईव्हीएमविरोधात आंदोलन उभे करण्याचे संकेत दिले आहेत. शरद पवार यांच्या ईव्हीएमविरोधातील भूमिकेनंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत पलटवार केला आहे. 

मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली, असा दावा करत 2014 पासूनची मतदानाची आकडेवारीच बावनकुळेंनी मांडली आहे. तसेच मारकडवाडी गाव हे शरद पवार किंवा उत्तमराव जानकरांची मक्तेदारी नाही.पवार साहेब, मारकडवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी बघा म्हणजे तुमचं  डोकं ठिकाणावर येईल, असा घणाघातही त्यांनी केला आहे.

काय आहे चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्वीट?

शरद पवार साहेब मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. तुमच्या माहितीसाठी २०१४, २०१९ आणि २०२४ ची मतांची आकडेवारी देत आहे जरा डोळेउघडून नीट वाचा. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना ५३३ मतं मिळाली तर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांना ६६४ मतं मिळाली होती.

नक्की वाचा: 'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? रामदास आठवलेंचा रोखठोक सवाल

त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हनुमंत डोळस यांना २९४ मते मिळाली तर अपक्ष अनंत खंडागळे यांना ९७९ मते मिळाली. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ९५६ मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना ३९५ मतं मिळाली. मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीकडून लढलेल्या उत्तमराव जानकर यांना १३४६ मतं मिळाली तर भाजपाकडून लढलेल्या राम सातपुते यांना ३०० मतं मिळाली.

२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना १०२१ मतं तर भाजपाच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ४६६ मतं मिळाली विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उत्तमराव जानकर यांना ८४३ मतं तर भाजपच्या राम सातपुते यांना १००३ मतं मिळाली. 

या आकडेवारीवरून स्पष्ट होत की, मारकडवाडी ग्रामस्थांनी कधी राष्ट्रवादीला साथ दिली, कधी अपक्ष तर कधी भाजपाला साथ दिली. त्यामुळे हे गाव कुणा एकाची मक्तेदारी नाही. यावेळी लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलं. त्यामुळे उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नका. जरा मारकवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी डोळे उघडून वाचा म्हणजे तुमचं  डोकं ठिकाणावर येईल, असं बावनकुळेंनी म्हटले आहे. 

महत्वाची बातमी: भटक्या कुत्र्यांची दहशतीमुळे नागरिक बेजार; 8 वर्षांच्या मुलाच्या गुप्तांग आणि ओठाचा घेतला चावा

Listen to the latest songs, only on JioSaavn.com