VIDEO: 'दोस्ती तुटायची नाय..' सचिनच्या बर्थडेचं विनोद कांबळीकडून हटके सेलिब्रेशन; शिवाजी पार्कवर दिलं सरप्राईज

शिवाजी पार्कच्या त्याच मातीत जिथे या दोघांनी स्वप्न पाहायला सुरुवात केली, तिथे लहान मुलांसोबत बसून कांबळीने सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, ज्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

 Vinod Kambli Celebrates Sachin Tendulkars Birthday Video:  क्रिकेटचा देव, भारतरत्न, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 53 वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. क्रिडा विश्वातील या महान फलंदाजावर वाढदिवसानिमित्त जगभरातुन शुभेच्छांचा वर्षाव झाला. एकीकडे वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच, सचिनचा बालपणीचा मित्र विनोद कांबळी याने दिलेली शुभेच्छा लक्षवेधी ठरली आहे. शिवाजी पार्कच्या त्याच मातीत जिथे या दोघांनी स्वप्न पाहायला सुरुवात केली, तिथे लहान मुलांसोबत बसून कांबळीने सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, ज्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

IPL 2026: मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलणार? हार्दिक पंड्याची जागा घेण्यासाठी 'हे' स्टार्स रेसमध्ये सर्वात पुढे

सचिनचा बर्थडे, मित्राचं खास गिफ्ट! 

 पार्टनर, आज सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे," अशा शब्दांत कांबळीने सचिनबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले. 1980 च्या दशकात शालेय क्रिकेट गाजवणाऱ्या या जोडीने भारतीय क्रिकेटमध्ये एक वेगळीच उंची गाठली होती. जरी सचिनची कारकीर्द 24 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासाची ठरली आणि कांबळीची कारकीर्द काही कारणास्तव लवकर आटोपली असली, तरी या दोघांमधील मैत्री आजही तितकीच घट्ट आहे. 24 एप्रिल 1973 रोजी जन्मलेला सचिन आज जगातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक पूर्ण करणारा तो एकमेव फलंदाज असून, ३४,३५७ आंतरराष्ट्रीय धावांचा त्याचा विक्रम आजही अबाधित आहे.

Advertisement

​कांबळी म्हणाला की, "२४ एप्रिल हा दिवस माझ्यासाठी नेहमीच खास असतो. आम्ही मैदानावर एकत्र घालवलेले ते दिवस, वाढदिवसाचे सेलिब्रेशन आणि आमची ती अभेद्य भागीदारी आजही माझ्या स्मरणात ताजी आहे."  दिनशॉ आईस्क्रिम या ब्रँडसाठी विनोद कांबळीने हा व्हिडिओ शूट केला आहे. ज्यामध्ये तो शिवाजी पार्कमध्ये लहान मुलांना आईस्क्रिम देताना दिसत आहे. या व्हिडिओवर क्रिडाप्रेमींनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. 

दरम्यान, सचिनच्या नावावर आज अनेक जागतिक विक्रम आहेत. २०० कसोटी सामने खेळणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. विशेष म्हणजे, आपल्या ७९ व्या एकदिवसीय सामन्यात पहिले शतक झळकावल्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. १५,९२१ कसोटी धावा आणि ५१ कसोटी शतकांचा डोंगर उभा करणाऱ्या या 'मास्टर ब्लास्टर'ने भारतीय क्रिकेटला जागतिक पटलावर नवी ओळख मिळवून दिली आहे.

( नक्की वाचा : Rohit Sharma: टीममध्ये नसूनही रोहितच ठरला 'गेमचेंजर'; गुजरातविरुद्ध 'हिटमॅन'ने असा फिरवला सामन्याचा निकाल! )