जाहिरात

IPL 2026: मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलणार? हार्दिक पंड्याची जागा घेण्यासाठी 'हे' स्टार्स रेसमध्ये सर्वात पुढे

Who Will Replace Hardik Pandya as MI Captain IPL 2026: पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची या सिझनमध्ये आत्तापर्यंत निराशाजनक कामगिरी झाली आहे.

IPL 2026: मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलणार? हार्दिक पंड्याची जागा घेण्यासाठी 'हे' स्टार्स रेसमध्ये सर्वात पुढे
Hardik Pandya : मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीमुळे हार्दिक पांड्याची कॅप्टनसी अडचणीत आली आहे.
मुंबई:

Who Will Replace Hardik Pandya as MI Captain IPL 2026: पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची या सिझनमध्ये आत्तापर्यंत निराशाजनक कामगिरी झाली आहे. मुंबई इंडियन्सनं आत्तापर्यंत सातपैकी फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे मुंबईची टीम सध्या स्पर्धेत बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. 

गुरुवारी आपल्याच घरच्या मैदानात म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सकडून तब्बल 103 रनच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर मुंबई इंडियन्सवर टीकेची झोड उठत आहे. हा पराभव मुंबईच्या इतिहासातील घरच्या मैदानावरील सर्वात मोठा पराभव ठरला आहे. टीमचे हेड कोच महेला जयवर्धने यांनी देखील या कामगिरीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आयपीएल 2026 मधील हा निराशाजनक काळ असल्याची कबुली दिली आहे. यामुळे आता टीमच्या नेतृत्वात बदल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कोण होणार मुंबई इंडियन्सचा कॅप्टन?

मुंबई इंडियन्सनं नेतृत्वबदल करण्याचं ठरवल्यास हार्दिक पांड्याची जागा घेण्यासाठी रोहित शर्माचं नाव सर्वात आघाडीवर आहे. रोहितच्या नेतृत्त्वाखाली मुंबईनं 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा पाचवेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलंय. 

सोशल मीडियावर रिटर्न ऑफ हिटमॅन अशी जोरदार चर्चा सुरू असून मुंबईला या संकटातून रोहितचा अनुभवच बाहेर काढू शकतो असा विश्वास अनेकांना वाटत आहे. रोहितने कठीण प्रसंगात टीमला सावरण्याचे कौशल्य अनेकदा सिद्ध केले असल्याने तो या रेसमध्ये सर्वात आघाडीवर आहे.

( नक्की वाचा : Rohit Sharma: टीममध्ये नसूनही रोहितच ठरला 'गेमचेंजर'; गुजरातविरुद्ध 'हिटमॅन'ने असा फिरवला सामन्याचा निकाल! )

दुसरीकडे सूर्यकुमार यादव देखील कप्तानीसाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. सूर्या सध्या टी20 क्रिकेटमधील जगातील अव्वल बॅटर आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने नुकताच आपल्या कप्तानीखाली टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कप 2026 चं विजेतेपद पटकावलंय.  सूर्याची नेतृत्व करण्याची शैली आणि छोट्या फॉरमॅटमधील त्याचा विजय मिळवण्याचा दर पाहता, मुंबई इंडियन्स त्याच्याकडं टीमची जबाबदारी सोपवू शकते.


या दोन भारतीय स्टार्सशिवाय न्यूझीलंडचा अनुभवी ऑलराउंडर मिचेल सँटनर याचे नाव सर्वांना चकित करणारे ठरत आहे. सँटनरने टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये न्यूझीलंडला फायनलपर्यंत नेत नेतृत्वक्षमता दाखवून दिली आहे. मुंबई इंडियन्सने नेहमीच भारतीय खेळाडूला कप्तान बनवण्याला पसंती दिली आहे, पण सध्याची टीमची अवस्था पाहता सँटनरचा शांत स्वभाव आणि गेम प्लॅनिंग मुंबईला नवा मार्ग दाखवू शकते. त्यामुळे हार्दिकची हकालपट्टी होणार का? झाली तर कुणाची निवड होणार? याची सध्या चर्चा सुरु आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com