Vinod Kambli: आधारा शिवाय चालणं ही कठीण! मॅच पाहण्यासाठी आलेल्या विनोद कांबळीचा Video Viral, चाहते हेलावले

अजून ही स्वत:च्या पायावर विनोद यांना चालता येत नाही हे यातून दिसत आहे. त्यांना आधाराची गरज लागत आहे हे स्पष्ट झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आयपीएल 2026 मधील मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमवर एक भावुक क्षण पाहायला मिळाला. भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विनोद कांबली हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर आला होता. मात्र, सामना संपल्यानंतर बाहेर पडतानाचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये त्याला चालण्यासाठी दुसऱ्याच्या आधाराची गरज असल्याचं दिसत आहे. कांबली यांची ही अवस्था पाहून त्यांचे चाहते कमालीचे भावुक झाले आहेत. विनोद कांबळी याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शिवाय त्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट ही पडत आहेत. 

कांबली गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर आजारपणाशी झुंज देत आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्याची चिंताजनक माहिती समोर आली होती. त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्यांना मदतीचा हात दिला. या वैद्यकीय उपचार आणि मदतीमुळे त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. ही दिलासादायक बाब असली तरी त्यांना शारीरिक हालचाली करताना आणि चालताना अजूनही मोठा त्रास होत असल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट झाले आहे.

Advertisement

नक्की वाचा - LSG vs PBKS: बाप तो बापचं! पहिल्याच सामन्यात लेकानं मैदान गाजवलं, सचिनची पोस्ट चर्चेत, पण...

समोर आलेल्या व्हिडीओत विनोद कांबळीने निळ्या रंगाची जिन्स घातली आहे. तर चॉकलेटी रंगाचा शर्ट घातला आहे. त्याला एका बाजून एका छोट्या मुलीने पकडले आहे. तर दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती त्याला पकडून चालला आहे. दोघांचे हात धरून एक-एक पाऊल टाकल विनोद कांबळी चालताना दिलत आहे. शिवाय फॅन्सकडे पाहून तो काही तरी बोलत असताना ही या व्हिडीओत पाहायला भेटत आहे. हाच व्हिडीओ विनोद कांबळी यांची सध्याची स्थिती काय आहे हे दर्शवत आहे. अजून ही स्वत:च्या पायावर विनोद यांना चालता येत नाही हे यातून दिसत आहे. त्यांना आधाराची गरज लागत आहे हे स्पष्ट झाले आहे. 

नक्की वाचा - CM Vijay: किंग कोहलीचं 'विजय' कनेक्शन! तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना मिळालं खास गिफ्ट, पाहा क्रेझ

दरम्यान या सामन्यात पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध 30 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 205 धावांचा डोंगर उभारला. ध्रुव जुरेलने सर्वाधिक 38 तर जोफ्रा आर्चरने अवघ्या 15 चेंडूत 3 षटकारांसह 32 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली. रोहित शर्मा शून्य धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादवने 60 धावांची झुंजार खेळी केली, तर विल जॅकने 33 आणि हार्दिक पंड्याने 34 धावा केल्या. मात्र, इतर फलंदाजांच्या अपयशामुळे मुंबईला हा सामना गमवावा लागला. राजस्थानकडून आर्चरने 13 धावांत 3 बळी घेतले.