जाहिरात

CM Vijay: किंग कोहलीचं 'विजय' कनेक्शन! तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना मिळालं खास गिफ्ट, पाहा क्रेझ

जोसेफ विजय यांनी 1984 मध्ये 'वेट्री' चित्रपटातून बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात केली होती.

CM Vijay: किंग कोहलीचं 'विजय' कनेक्शन! तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना मिळालं खास गिफ्ट, पाहा क्रेझ
  • तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची स्वाक्षरी असलेली क्रिकेट बॅट भेट
  • एमआरएफ कंपनीचे चेअरमन केएम माम्मेन आणि त्यांच्या टीमने मुख्यमंत्री विजय यांची भेट घेतली
  • विजय 2024 मध्ये राजकारणात प्रवेश करून मुख्यमंत्रीपद प्राप्त केले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

तमिलनाडुचे मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते जोसेफ विजय यांना शुक्रवारी एक अत्यंत खास भेट मिळाली. ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. एमआरएफ (MRF) कंपनीच्या टीमने त्यांना भारतीय क्रिकेट स्टार विराट कोहलीची स्वाक्षरी असलेली क्रिकेट बॅट भेट दिली आहे. विजय यांनी ही बॅट हातात धरून फोटो काढले असून, सध्या सोशल मीडियावर या फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे.

एमआरएफ कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर केएम माम्मेन, अरुण माम्मेन आणि राहुल माम्मेन यांनी मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन विजय यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी राज्यातील कंपनीच्या कामकाजाविषयी आणि गुंतवणुकीबाबत चर्चा केली. याच बैठकीदरम्यान कंपनीच्या वतीने विजय यांना ही विशेष बॅट देण्यात आली. समोर आलेल्या फोटोंमध्ये विजय पांढऱ्या सूटमध्ये आणि खांद्यावर अंगवस्त्रम घेतलेले दिसत आहेत. बॅट हातात धरून ते हसताना दिसत आहेत. विराट कोहलीच्या स्वाक्षरीमुळे क्रिकेट चाहत्यांसाठी ही बॅट अत्यंत मौल्यवान मानली जात आहे.

नक्की वाचा - 14-14 तास अभ्यास, पाण्याकडे दुर्लक्ष, किडनी फेल झाली, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहाणाऱ्या तरुणाचा संघर्ष

काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक व्यंकट प्रभू यांनी विजय यांना 'TN 07 CM 2026' लिहिलेली एक खास नंबर प्लेट गिफ्ट केली होती. जी त्यांच्या राजकीय विजयाची भविष्यवाणी ठरली. बालकलाकार ते तमिळ सिनेमाचा सुपरस्टार आणि आता थेट राज्याचा मुख्यमंत्री असा विजय यांचा प्रवास थक्क करणारा आहे. राजकारणात आल्यानंतरही त्यांची ही क्रेझ कायम असून, चाहत्यांनी सोशल मीडियावर "आमच्या मुख्यमंत्र्यांचा नादच खुळा" अशा कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. त्यांचा विराटची बॅट हातात घेतलेला फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

नक्की वाचा - Akola News: '500 रुपयांसाठी 18 एकर शेती पेटवली' प्रकरण ऐकून अंगावर काटा येईल

प्रसिद्ध दिग्दर्शक एसए चंद्रशेखर यांचे सुपुत्र असलेल्या जोसेफ विजय यांनी 1984 मध्ये 'वेट्री' चित्रपटातून बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर 1992 मध्ये 'नालैया थेरपू' चित्रपटातून त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. 1996 मधील 'पूवे उनक्काग' या चित्रपटानंतर ते तमिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार बनले. प्रदीर्घ अभिनय कारकीर्दीनंतर 2024 मध्ये त्यांनी 'तमिळगा वेत्री कझगम' (TVK) पक्षाची स्थापना करून राजकारणात प्रवेश केला. 2026 च्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून ते तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले आहेत. राजकारणात पूर्णवेळ येण्यापूर्वी त्यांनी 'जना नायगन' हा चित्रपट साइन केला होता, जो अद्याप रिलीज झालेला नाही.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com