Virat Kohli 58 Runs Away From Breaking Sachin Tendulkar Record: क्रिकेट जगतात विराट कोहलीची तुलना नेहमीच सचिन तेंडुलकर बरोबर केली जाते. मात्र सचिनला लहान पणापासून आपण पाहात आलो आहे. त्यामुळे अशी तुलना करणे चुकीचे आहे असे विराट कोहली नेहमीच सांगतो. सचिनने क्रिटेटमधून निवृत्ती घेवून अनेक वर्ष झाली आहेत. तर विराट कोहली आजही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. सध्या तो वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. नुकत्याच झालेल्या टी 20 वर्ल्डकपनंतर त्याने टी 20 प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विराट कोहली इतिहास रचणार
भारतीय क्रिकेट संघ बांग्लादेश विरोधात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत विरोट कोहलीने चांगील बॅटींग केली तर तो आपल्या नावावर आणखी एक रेकॉर्ड करू शकतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 27,000 धावा करण्याचे रेकॉर्ड हे सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्यांने हे रेकॉर्ड 623 डावांमध्ये केले आहे. त्यात 226 टेस्ट, 396 वनडे आणि 1 टी20 सामन्यातून केले आहे. त्यानंतर त्यांना 27,000 धावा करता आल्या. या पार्श्वभूमीवर आगामी दौऱ्यात विराट कोहलीने 58 धावा केल्या, तर तो सचिनचं रेकॉर्ड मोडू शकेल. विराट कोहलीने आतापर्यंत 591 खेळ्या केल्या आहेत. त्यात त्याने 26 हजार 942 धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग बातमी - पूरग्रस्तभागात काँग्रेस खासदाराची स्टंटबाजी, व्हिडीओ तुफान व्हायरल
विराट कोहलीकडे अजून तसा बराच वेळ आहे. जरी त्याला बांग्लादेश विरुद्ध 58 धावा करता आल्या नाहीत तरी त्याला पुढेही संघी आहे. त्याला आतापर्यंत 591 डाव खेळता आले आहेत. त्याच्याकडे अजून 8 डाव शिल्लक आहे. त्यात त्याला 58 धावा करायच्या आहेत. तो आगामी सिरीजमध्येच हे रेकॉर्ड मोडेल अशी शक्यता आहे. क्रिकेटच्या 147 वर्षाच्या इतिहासात कोणत्याही फलंदाजाला 600 पेक्षा कमी डावात 27,000 धावा करता आलेल्या नाहीत. तसं झाल्यास कोहली हा जगातील पहीला फलंदाज ठरेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता 27 हजार धावा करणारे तीन खेळाडू आहेत. त्यात सचिन तेंडुलकर, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटींग आणि श्रीलंकेचा कुमार संगकाराचा समावेश आहे. या तिघांनी 27000 पेक्षा जास्त घावा केल्या आहेत. त्यामुळे नवा इतिहास बनवण्याच्या अगदी जवळ विराट कोहली आहे. त्यामुळे 58 होताच सर्वात जलद सत्तावीस हजार धावा करण्याचं नवं रेकॉर्ट किंग कोहलीच्या नावावर होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world