Chhattisgarh News: अचानक एखाद्या खेडेगावातील पानटपरीवर बसलेल्या तरुणाला विराट कोहली, एबी डीव्हीलियर्स, रजत पाटीदार. असे क्रिडा विश्वातल्या दिग्गजांचे फोन यायला लागले तर... स्वप्नवत किंवा एखाद्या सिनेमासारखा वाटणारा हा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे. छत्तीसगडच्या गरियाबाद जिल्ह्याच्या मडगावमधील तरुणासोबत घडलेल्या या प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. काय आहे कारण? वाचा...
मनीष आणि खेमराज हे दोन अनोळखी मित्र अचानक क्रिकेट दिग्गजांच्या व्हीआयपी संपर्क यादीत आले. २८ जून रोजी मनीषने स्थानिक मोबाईल दुकानातून नवी सिम खरेदी केले तेव्हापासून हा सर्व प्रकार सुरु झाला. सुरुवातीला सर्व सामान्य होते मात्र वॉट्सअपला क्रिकेटपटू रजत पाटीदारचा फोटो अपडेट झाला अन् अचानक वेगवेगळे कॉल यायला लागले. हे कॉल नातेवाईकांचे नव्हते तर क्रिकेट विश्वातील दिग्गजांकडून आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे यायला लागले.
Asia Cup 2025: आशिया कप स्पर्धेआधी टीम इंडियासाठी खुशखबर! जखमी 'सिक्सर किंग'ची मैदानात एन्ट्री
कधी विराट कोहली, कधी एबी डिव्हिलियर्सच्या नावाने त्यांना फोन यायचे. या दोघांना हा सर्व कुणाचातरी खोडसाळपणा वाटला. त्यामुळे असे कॉल करणाऱ्यांची ते सुद्धा चेष्टा करायचे. आम्ही महेंद्रसिंग धोनी बोलतोय म्हणायचे. पण १५ जुलै रोजी मनीषला पुन्हा एका अनोळखी नंबरवरून फोन आला. यावेळी, एक तरुण सभ्य आवाज म्हणाला, "भाई, मी रजत पाटीदार आहे. हा नंबर माझा आहे, कृपया तो परत करा." दोन्ही मित्रांना हा सर्व प्रकार खोटा वाटला ज्यामुळे त्यांनी त्याला आम्ही एमएस धोनी बोलतोय, असं म्हणत त्याची चेष्टा केली.
पण समोरुन बोलणाऱ्या रजत पाटीदारने अतिशय धीराने त्यांना सांगितले की हा नंबर खूप महत्वाचा आहे आणि त्याचे प्रशिक्षक, मित्र आणि क्रिकेटमधील दिग्गज त्याच्याशी जोडलेले आहेत. तरीही तरीही त्या तरुणांना हा प्रकार खोटा वाटला. अखेर वैतागलेल्या रजत पाटीदारने मी पोलिसांना पाठवतो' असा इशारा दिला. त्यानंतर १० मिनिटांत, पोलिसही त्यांच्या दारावर पोहोचले. मग त्यांना समजले की ते खऱ्या रजत पाटीदारशी बोलत आहेत. दोघांनीही तात्काळ सिम परत केला."चुकीच्या नंबरमुळे मला कोहलीशी बोलण्याची संधी मिळाली. माझ्या आयुष्याचे ध्येय साध्य झाले आहे, अशा प्रतिक्रिया या तरुणांनी दिल्या.
Vaseline मुळे भारतीय संघ ओव्हल कसोटी जिंकला! पाकिस्तानी क्रिकेटपटूचा खुळचट आरोप
दरम्यान, सीमकार्ड देणाऱ्या कंपन्यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडला. टेलिकॉम कंपन्या ९० दिवसांहून अधिक काळ बंद असलेले नंबर पुन्हा नव्याने सुरु करतात. रजत पाटीदारचा जुना नंबर निष्क्रिय करून मनीष यांना देण्यात आला, ज्यामुळे अनवधानाने एका लहान किराणा दुकानदार मुलगा दिग्गज क्रिकेटपटूंच्या संपर्कात आला. या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.