Andre Russell Retirement : वेस्ट इंडिजचे ऑलराउंडर आंद्रे रसेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहेत. तो आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाच्या विरोधात खेळेल. रसेलच्या निवृत्तीच्या वृत्ताच्या बातमीवर देशातील क्रिकेट बोर्डाने त्यांचे 17 फोटो शेअर करीत धन्यवाद दिले आहेत.
क्रिकेट बोर्डाने सांगितलं की, जेव्हाही रसेल मैदानावर होता तुफान कामगिरीत करीत होता. रसेल दोन वेळा टी-20 वर्ल्ड कप चॅम्पियन टीमचा भाग राहिला आहे. क्रिकेट बोर्ड तुम्हाला सलाम करतो. रसेल यांच्या निवृत्तीमुळे इंडिजच्या टीमला मोठा धक्का आहे.
नक्की वाचा - रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीमागे कुणाचा हात? BCCI उपाध्यक्षांनी सांगितलं सर्व सत्य
वेस्ट इंडिजसाठी 2019 पासून रसेल केवळ टी-20 खेळत आहे. 27 वर्षांच्या या ऑलराऊंडरची ऑस्ट्रेलियाच्या विरोधात घरेलू सीरिजसाठी निवड करण्यात आली आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिले दोन सामने रसेलच्या कारकिर्दीतील शेवटचे सामने असतील. निवृत्तीच्या बातमीवर रसेल म्हणाला- वेस्ट इंडिजकडून खेळणे शब्दात वर्णन करता येणार नाही... त्यामुळे मला अधिक सक्षम होण्याची प्रेरणा मिळाली.
क्रिकेट बोर्डाने शेअर केलेल्या रसेलच्या छायाचित्रांमध्ये तो देशातील माजी क्रिकेटपटूंसोबत दिसतो. 12 क्रमांकाची जर्सी घालून देशाचे प्रतिनिधित्व करणारा रसेल भारतातही खूप लोकप्रिय आहे.तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये फलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून भाग घेतो. संघाचा कर्णधार त्याला गरजेनुसार गोलंदाजी करण्याची संधी देखील देतो.