जाहिरात

T20 World Cup 2026: सगळीकडे फक्त NRR ची चर्चा, भारत सेमी फायनल गाठणार का? काय आहे नेट रन-रेटचा फॉर्म्युला?

दक्षिण आफ्रिकेने भारता विरोधात रविवारी सुपर-8 फेरीच्या पहिल्याच सामन्यात 76 धावांनी विजय मिळवला आणि बघता बघता नेट रन-रेटच्या चर्चांना उधाण आलं. जाणून घ्या नेट रन-रेटच्या फॉर्म्युल्याबाबत सविस्तर माहिती.

T20 World Cup 2026: सगळीकडे फक्त NRR ची चर्चा, भारत सेमी फायनल गाठणार का? काय आहे नेट रन-रेटचा फॉर्म्युला?
NRR Formula For T20 World Cup 2026

T20 World Cup 2026 : कधी कधी एखादी वस्तू कोपऱ्यात पडून असते आणि जेव्हा तिचा वेळ येतो,तेव्हा ती अचानकच मान-सन्मान आणि चर्चेचा विषय बनते. असाच काहीसा प्रकार सध्या सुरु असलेल्या T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये NRR म्हणजेच नेट रन-रेटच्या बाबतीत घडत आहे.दक्षिण आफ्रिकेने भारता विरोधात रविवारी सुपर-8 फेरीच्या पहिल्याच सामन्यात 76 धावांनी विजय मिळवला आणि बघता बघता नेट रन-रेटच्या चर्चांना उधाण आलं.  

जर भारत विरुद्ध झिम्बाब्वेच्या पुढील सामन्यात (Ind vs Zim) किंवा सुपर 8 फेरीच्या शेवटच्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या शेवटच्या सामन्यात (India vs West Indies) काही चूक झाली, तर मग भारत  सेमीफायनलमध्ये पोहोचेल की नाही? हे सर्व गणित नेट रन-रेटवरच अवलंबून राहणार आहे. एखादी टीम किती वेगाने रन करते आणि गोलंदाजी करताना किती वेगाने रन देते, यातील फरक काय आहे,हे जाणून घेण्यासाठी NRR पद्धत वापरली जाते. 

  • फलंदाजी दरम्यान टीमने केलेल्या एकूण धावांना खेळलेल्या एकूण ओव्हर्सने भागले जाते.
  • गोलंदाजी दरम्यान टीमने दिलेल्या एकूण धावांना टाकलेल्या एकूण ओव्हर्सने भागले जाते.

ओव्हर्सची बेरीज करताना प्रत्यक्षात खेळलेल्या/टाकलेल्या चेंडूंची संख्या वापरली जाते. 

उदा. → 19.3 ओव्हर = 19.5 ओव्हर मानले जाते.
(कारण .3 म्हणजे 3 बॉल आणि 3 बॉल = 0.5 ओव्हर)

नक्की वाचा >> Best Budget 7 Seater Car 2026: भारताच्या 5 सर्वात स्वस्त 7 सीटर Car, एका गाडीत बसेल अख्ख कुटुंब

असं करतात NRR चं कॅल्क्यूलेशन

0.1 ओव्हर = 1/6=0.166

0.2 ओव्हर = 2/6= 0.333

0.3 ओव्हर = 3/6= 0.500

0.4 ओव्हर = 4/6= 0.666

0.5 ओव्हर = 5/6= 0.833

नक्की वाचा >> Inspirational Story: दोन भावांचं रातोरात चमकलं नशिब..कमी वयातच लाखोंची Mercedes केली खरेदी, जगभर होतेय चर्चा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याचं उदाहरण    

टीम        रन ओव्हर NRR साठी ओव्हररन-रेट
दक्षिण अफ्रीका   187  20   20   187/20=9.35
      भारत                  111  18.5 20 111/20=5.55

भारतासाठी  NRR:  5.55-9.35 = -3.800

या परिस्थितींमध्ये NRR (नेट रन-रेट) वापरला जात नाही
• सुपर ओव्हर:
सुपर ओव्हरमध्ये केलेल्या धावांचा समावेश NRR मध्ये केली जात नाही.
• DLS पद्धत:
जर पावसामुळे सामना कमी षटकांचा खेळवला, तर "टीम 1" (जी पहिली बॅटिंग करते) ला "टीम 2" च्या सुधारित लक्ष्यापेक्षा एक धावा कमी करत तेवढ्या ओव्हर्सचा क्रेडिट दिला जातो, जितके ओव्हर्स टीम 2 ला दिले गेले आहेत.
• रद्द सामना (No Result):
जर एखादा सामना "नो रिजल्ट" (वॉशआउट) झाला, तर त्या सामन्यात NRR चा वापर केला जात नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com