T20 World Cup 2026 : कधी कधी एखादी वस्तू कोपऱ्यात पडून असते आणि जेव्हा तिचा वेळ येतो,तेव्हा ती अचानकच मान-सन्मान आणि चर्चेचा विषय बनते. असाच काहीसा प्रकार सध्या सुरु असलेल्या T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये NRR म्हणजेच नेट रन-रेटच्या बाबतीत घडत आहे.दक्षिण आफ्रिकेने भारता विरोधात रविवारी सुपर-8 फेरीच्या पहिल्याच सामन्यात 76 धावांनी विजय मिळवला आणि बघता बघता नेट रन-रेटच्या चर्चांना उधाण आलं.
जर भारत विरुद्ध झिम्बाब्वेच्या पुढील सामन्यात (Ind vs Zim) किंवा सुपर 8 फेरीच्या शेवटच्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या शेवटच्या सामन्यात (India vs West Indies) काही चूक झाली, तर मग भारत सेमीफायनलमध्ये पोहोचेल की नाही? हे सर्व गणित नेट रन-रेटवरच अवलंबून राहणार आहे. एखादी टीम किती वेगाने रन करते आणि गोलंदाजी करताना किती वेगाने रन देते, यातील फरक काय आहे,हे जाणून घेण्यासाठी NRR पद्धत वापरली जाते.
- फलंदाजी दरम्यान टीमने केलेल्या एकूण धावांना खेळलेल्या एकूण ओव्हर्सने भागले जाते.
- गोलंदाजी दरम्यान टीमने दिलेल्या एकूण धावांना टाकलेल्या एकूण ओव्हर्सने भागले जाते.
ओव्हर्सची बेरीज करताना प्रत्यक्षात खेळलेल्या/टाकलेल्या चेंडूंची संख्या वापरली जाते.
उदा. → 19.3 ओव्हर = 19.5 ओव्हर मानले जाते.
(कारण .3 म्हणजे 3 बॉल आणि 3 बॉल = 0.5 ओव्हर)
नक्की वाचा >> Best Budget 7 Seater Car 2026: भारताच्या 5 सर्वात स्वस्त 7 सीटर Car, एका गाडीत बसेल अख्ख कुटुंब
असं करतात NRR चं कॅल्क्यूलेशन
0.1 ओव्हर = 1/6=0.166
0.2 ओव्हर = 2/6= 0.333
0.3 ओव्हर = 3/6= 0.500
0.4 ओव्हर = 4/6= 0.666
0.5 ओव्हर = 5/6= 0.833
नक्की वाचा >> Inspirational Story: दोन भावांचं रातोरात चमकलं नशिब..कमी वयातच लाखोंची Mercedes केली खरेदी, जगभर होतेय चर्चा
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याचं उदाहरण
| टीम | रन | ओव्हर | NRR साठी ओव्हर | रन-रेट |
| दक्षिण अफ्रीका | 187 | 20 | 20 | 187/20=9.35 |
| भारत | 111 | 18.5 | 20 | 111/20=5.55 |
भारतासाठी NRR: 5.55-9.35 = -3.800
या परिस्थितींमध्ये NRR (नेट रन-रेट) वापरला जात नाही
• सुपर ओव्हर:
सुपर ओव्हरमध्ये केलेल्या धावांचा समावेश NRR मध्ये केली जात नाही.
• DLS पद्धत:
जर पावसामुळे सामना कमी षटकांचा खेळवला, तर "टीम 1" (जी पहिली बॅटिंग करते) ला "टीम 2" च्या सुधारित लक्ष्यापेक्षा एक धावा कमी करत तेवढ्या ओव्हर्सचा क्रेडिट दिला जातो, जितके ओव्हर्स टीम 2 ला दिले गेले आहेत.
• रद्द सामना (No Result):
जर एखादा सामना "नो रिजल्ट" (वॉशआउट) झाला, तर त्या सामन्यात NRR चा वापर केला जात नाही.