Ind vs AUS T20 Schedule: वनडेनंतर टी20 चा थरार! कधी आणि कुठे रंगणार सामना? पाहा संपूर्ण वेळापत्रक

भारतीय संघ कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav)  नेतृत्वाखाली पाच सामन्यांची टी-२० मालिका (T20 Series) खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

India Australia T20 Series Full Schedule: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील तीन सामन्यांची वन-डे मालिका नुकतीच संपली. सिडनीत शेवटचा सामना जिंकून भारतीय संघाने लाज राखली असली तरी ऑस्ट्रेलियाने ही मालिका २-१ ने जिंकून आपली ताकद दाखवली आहे. वन-डे मालिकेतील पराभवानंतर आता भारतीय संघ कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav)  नेतृत्वाखाली पाच सामन्यांची टी-२० मालिका (T20 Series) खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे.

२९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत थरार:

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेची सुरुवात २९ ऑक्टोबर रोजी कॅनबेरा येथे होणार आहे. हा क्रिकेटचा थरार ८ नोव्हेंबरपर्यंत चालेल आणि मालिकेतील शेवटचा सामना ब्रिस्बेन येथे खेळला जाईल. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी सुरू होतील.

Video: देशासाठी कोहलीनं पुन्हा केलं 'विराट'काम! मैदानात दाखवली खरी देशभक्ती,ड्रेसिंग रुममध्ये जाताना जे केलं..

  • पहिला टी 20- 29 ऑक्टोबर, कॅनबेरा
  • दुसरा टी 20 - 31 ऑक्टोबर, मेलबर्न
  • तिसरा टी 20 - 2 नोव्हेंबर, होबार्ट
  • चौथा टी 20 - 6 नोव्हेंबर, गोल्ड कोस्ट
  • पाचवा टी 20 - 8  नोव्हेंबर, ब्रिस्बेन

भारताचा संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर.

ऑस्ट्रेलियाचा संघ: ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मिच मार्श (Mitch Marsh) करणार असून, ट्रॅव्हिस हेड, सीन ॲबॉट, जेवियर बार्टलेट, ॲडम झम्पा अशा अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ: मिच मार्श (कर्णधार), ट्रेविस हेड, सीन ॲबॉट, जेवियर बार्टलेट, टिम डेव्हिड, बेन ड्वार्शिस, नाथन एलिस, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), मॅथ्यू कुहनेमन, मिशेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस आणि ॲडम झम्पा.

Advertisement

IND vs AUS : रोहितच्या 'मास्टरस्ट्रोक'ने हर्षित राणाला कशी मिळाली दुसरी विकेट? 'सुपर चाली'चा किस्सा!

वन-डे मालिका गमावल्यानंतर टी-२० मध्ये आव्हान: वन-डे मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे भारताने ७ विकेट्सने, तर दुसरा सामना ॲडलेड येथे २ विकेट्सने गमावला होता. मात्र, सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वन-डेमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी दमदार खेळी करत भारताला ९ विकेट्सने विजय मिळवून दिला होता. आता वन-डेतील पराभवाचे उट्टे टी-२० मध्ये काढण्यासाठी 'कॅप्टन स्काय'च्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघ सज्ज झाला आहे.