जाहिरात

IND vs AUS : रोहितच्या 'मास्टरस्ट्रोक'ने हर्षित राणाला कशी मिळाली दुसरी विकेट? 'सुपर चाली'चा किस्सा!

IND vs AUS : सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये तरुण फास्ट बॉलर गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) याने जबरदस्त 'कमबॅक' करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.

IND vs AUS : रोहितच्या 'मास्टरस्ट्रोक'ने हर्षित राणाला कशी मिळाली दुसरी विकेट? 'सुपर चाली'चा किस्सा!
IND vs AUS : सिडनीमध्ये रोहित शर्माच्या 'मास्टरस्ट्रोक'चा हर्षितला फायदा झाला.
मुंबई:

IND vs AUS : सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये तरुण फास्ट बॉलर गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) याने जबरदस्त 'कमबॅक' करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. या सामन्यात माजी कॅप्टन रोहित शर्माची (Rohit Sharma) 'सुपर चाल' आणि श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) अविश्वसनीय कॅचने त्याला मोलाची साथ दिली, ज्यामुळे राणाने 4 विकेट्स घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

धमाकेदार पुनरागमन

या वन-डे सीरिजमध्ये सर्वात जास्त टीका सहन करावी लागलेल्या खेळाडूंमध्ये हर्षित राणाचे नाव होते. मात्र, सिडनीत त्याची सर्वोत्तम कामगिरी केली. त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये, त्याने 4 ओव्हर्समध्ये एकही विकेट न घेता 21 रन्स दिले होत्या. यानंतर पुन्हा एकदा त्याला कठोर टीकेचा सामना करावा लागेल असे वाटत होते.

पण, दुसऱ्या स्पेलमध्ये, त्याच्या 5 व्या ते 7 व्या ओव्हर्समील, अवघ्या 18 बॉलमध्ये त्याने सामन्याचे चित्र पालटले. या काळात त्याला 2 महत्त्वाच्या विकेट्स मिळाल्या. विशेष म्हणजे, या दोन्ही विकेट्समध्ये श्रेयस अय्यरचा कॅच आणि कर्णधार रोहित शर्माची 'सुपर चाल' निर्णायक ठरली.

'अय्यरचा' अविश्वसनीय कॅच

राणाने टाकलेल्या 6 व्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर ॲलेक्स कॅरी (Alex Carey) जोरदार बॅटिंग करत होता. पण, शॉर्ट थर्ड-मॅनवर उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) मागे धावत जाऊन जो अप्रतिम कॅच घेतला, तो अलीकडच्या काळातील सर्वोत्तम कॅचेसपैकी एक होता. हा कॅच इतका जबरदस्त होता की, ही विकेट हर्षित राणाच्या नावावर कमी आणि श्रेयस अय्यरची जास्त होती.  या महत्त्वपूर्ण विकेटनंतर रोहित शर्माच्या 'सुपर चाली'ने राणाची दुसरी विकेट मिळवून दिली.

रोहितची 'सुपर चाल' यशस्वी

हर्षितच्या पुढच्या ओव्हरपूर्वी (7 वे षटक)  रोहित शर्माने त्याच्याशी बरीच चर्चा केली. याचवेळी, नव्याने फलंदाजीला आलेल्या मायकल ओवेन (Michael Owen) विरुद्धची रणनीती ठरली. फलंदाज नवीन असल्याने, रोहितच्या सांगण्यावरून शुभमन गिलला पहिल्या स्लिपमध्ये तैनात करण्यात आले.

राणाने बॉलिंग करताना नेमका त्याच 'टप्प्यावर' चेंडू ठेवला, जिथे त्याची गरज होती. तो बॉल बॅटच्या कडेला लागला आणि बॉल थेट रोहित शर्माच्या हातात विसावला. रोहितची 'सुपर चाल' यशस्वी झाली आणि हर्षित राणाला दुसरी विकेट मिळाली!

( नक्की वाचा : Virat Kohli: 305 वनडेमध्ये विराट कोहलीची पहिल्यांदाच दिसली 'ती' स्माईल, गावस्करांची भविष्यवाणी खरी ठरणार? )
 

टीकाकारांना चोख उत्तर

सिडनीचा हा सामना हर्षित राणासाठी  अविस्मरणीय ठरला. टीकाकारांचा सामना करत त्याने कंगारूंच्या डावातील शेवटच्या 2 विकेट्सही घेतल्या आणि त्यांना बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले. राणाने मागील सामन्यातील हिरो कूपर कोनोली (Cooper Connolly) आणि जॉश हेजलवूड (Josh Hazlewood) यांना बाद केले.

एकंदरीत, हर्षित राणाने 8.4 षटकांमध्ये केवळ 39 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे त्याचा आत्मविश्वास तर वाढेलच, पण कृष्णाचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) यांच्यासारख्या दिग्गजांकडून होणारी कठोर टीकाही शांत होईल, यात शंका नाही.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com