WOMEN T20 WORLD CUP 2024 WI vs NZ: न्यूझीलंडचा दणदणीत विजय, वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत पटकावलं फायनलचं तिकीट 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

यूएईमध्ये आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 चा दुसरा (Women T20 world cup 2024) सेमीफायनल सामना न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात शुक्रवारी खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडची कॅप्टन सोफी डिव्हाईनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाची (West Indies vs New Zealand ) सुरुवात काही चांगली झाली नव्हती. तरीही शारजाहच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 9 बाद 128 धावा केल्या आणि न्यूझीलंडने वेस्ट इंडिजवर 8 धावांनी दणदणीत विजय मिळवत थेट फायनलमध्ये धडक मारली आहे.

तिसऱ्यांदा न्यूझीलंडचा महिला संघ, महिला टी 20 विश्वचषकसाठी अंतिम सामना खेळणार आहे. जरी मागील दोन्हीवेळेस न्यूझीलंड महिला संघाला अंतिम फेरीत पोहचूनही ट्रोफी मिळण्यात  अपयश आलं असलं, तरी त्यांच्याकडे यंदा ट्रोफी जिंकण्याची  संधी आहे.  याआधी न्यूझीलंडने 14 वर्षांपूर्वी शेवटचा अंतिम फेरीत  सामना खेळला होता. त्यामुळे यंदा न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका होणाऱ्या फायनलकडे सगळ्यांचच लक्ष लागून आहे.

नक्की वाचा - IND vs NZ : बंगळुरुमध्ये कोहलीची 'विराट' कामगिरी, टेस्ट क्रिकेटमध्ये 'हा' रेकॉर्ड करणारा चौथा भारतीय

असा झाला सामना- 
या सामन्यात, न्यूझीलंड संघाची सुरुवात इतकी काही चांगली झाली नव्हती. न्यूझीलंडकरता, जॉर्जिया प्लंबरने 31 चेंडूत 33 धावा केल्या.  ब्रुक हॉलिडेने 9 चेंडूत 18 धावांची खेळी खेळली. तर अनुभवी फलंदाज सुझी बेट्स हिने 28 चेंडूत 26 धावा केल्या. त्याचबरोबर, इसाबेला गेजने 14 चेंडूत 20 धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर वेस्ट इंडिज संघातील डिआंड्रा डॉटिनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. एफी फ्लेचरने 2 विकेट आणि करिश्मा, अॅलेनेही प्रत्येकी एक फलंदाजाला आउट केले. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या  128 धावांना पत्युत्तर देत वेस्ट इंडिज संघातील डिआंड्रा डॉटिनने 22 चेंडूत 33 धावा, एफी फ्लेचरने 15 चेंडूत 17 धावा तर हेली मॅथ्यूजने 21 चेंडूत 15 धावांची खेळी केली. आणि न्यूझीलंडमधून एडन कारसनने 3 विकेट्स, अमेलिया केरने 2 विकेट्स तर, फ्रान जोनास, लेह ताहुहू आणि सुझी बेट्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.