जाहिरात

WCL 2025: WCL स्पर्धेत भारत-पाक भिडणार! कधी अन् कसा पाहाल सामना? पाहा संपूर्ण शेड्यूल

World championship Of Legends Schedule: भारत 27 जुलै रोजी इंग्लंडशी सामना खेळेल. 29 जुलै रोजी भारतीय संघ लीगमधील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजशी सामना खेळेल.

WCL 2025: WCL स्पर्धेत भारत-पाक भिडणार! कधी अन् कसा पाहाल सामना? पाहा संपूर्ण शेड्यूल

WCL T20 League Schedule: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 आजपासून म्हणजेच 18 जुलैपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा 18 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान यूकेमध्ये खेळवली जाईल. या स्पर्धेत एकूण 18 सामने खेळले जातील आणि त्यासोबतच, चाहत्यांना या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपरहिट सामना देखील पाहता येईल. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 20 जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे खेळला जाईल.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये भारतीय संघ प्रथम पाकिस्तानशी स्पर्धा करेल आणि नंतर 22 जुलै रोजी दक्षिण आफ्रिकेशी सामना खेळेल. त्याच वेळी भारताचा सामना 26 जुलै रोजी ऑस्ट्रेलियन संघाशी होणार आहे. त्यानंतर, भारत 27 जुलै रोजी इंग्लंडशी सामना खेळेल. 29 जुलै रोजी भारतीय संघ लीगमधील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजशी सामना खेळेल.

Andre Russell Retirement : वेस्ट इंडिजच्या ऑलराऊंडरची निवृत्ती, 17 फोटो शेअर करून म्हणाला, Thank You!


 वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) टी20 लीग वेळापत्रक


इंग्लंड चॅम्पियन विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन - बर्मिंगहॅम - 18 जुलै 2025

वेस्ट इंडिज चॅम्पियन विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन - बर्मिंगहॅम - 19 जुलै 2025

इंग्लंड चॅम्पियन विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन - बर्मिंगहॅम - 19 जुलै 2025

भारत चॅम्पियन विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन - बर्मिंगहॅम - 20 जुलै 2025

भारत चॅम्पियन विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन - नॉर्थम्प्टन - 22 जुलै 2025

इंग्लंड चॅम्पियन विरुद्ध वेस्ट इंडिज चॅम्पियन - नॉर्थम्प्टन - 22 जुलै 2025

ऑस्ट्रेलिया चॅम्पियन विरुद्ध वेस्ट इंडिज चॅम्पियन - नॉर्थम्प्टन - 23 जुलै 2025

इंग्लंड चॅम्पियन विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन - लीसेस्टरशायर - 24 जुलै 2025

पाकिस्तान चॅम्पियन विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन - लीसेस्टरशायर - 25 जुलै 2025

भारत चॅम्पियन विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन - लीड्स - जुलै 26, 2025

पाकिस्तान चॅम्पियन विरुद्ध वेस्ट इंडिज चॅम्पियन - लीड्स - 26 जुलै, 2025

दक्षिण आफ्रिका चॅम्पियन विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन - लीड्स - 27 जुलै, 2025

भारत चॅम्पियन विरुद्ध इंग्लंड चॅम्पियन - लीड्स - 27 जुलै, 2025

ऑस्ट्रेलिया चॅम्पियन विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन - लीसेस्टरशायर - 29 जुलै, 2025

भारत चॅम्पियन विरुद्ध वेस्ट इंडिज चॅम्पियन - लीसेस्टरशायर - 29 जुलै, 2025

फायनल 1 विरुद्ध फायनलिस्ट 2 - बर्मिंगहॅम - 2 ऑगस्ट, 2025

IND vs ENG: चौथ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला धक्का, स्टार फास्ट बॉलर जखमी

कधी अन् कसे पाहाल सामने?

सर्व वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 चे संध्याकाळचे सामने भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरू होतील, तर डबल-हेडर असलेले दिवसाचे सामने 18 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५ वाजता सुरू होतील. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सचे भारतातील टीव्हीवरील स्टार स्पोर्ट्स 1 स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी आणि स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी चॅनेलवर थेट प्रक्षेपण केले जाईल, तर स्पर्धेतील सर्व 18 सामन्यांचे थेट प्रक्षेपण फॅनकोड अॅपवर असेल.

असे असतील संघ:

भारत चॅम्पियन्स संघ:(कर्णधार: युवराज सिंग) विनय कुमार, हरभजन सिंग, पार्थिव पटेल, युसूफ पठाण, सुरेश रैना, युवराज सिंग, नमन ओझा, मुनाफ पटेल, रेतींदर सोधी, आरपी सिंग, अशोक दिंडा, इरफान पठाण, मोहम्मद कैफ, रॉबिन उथप्पा, प्रज्ञान ओझा

पाकिस्तान चॅम्पियन्स संघ:(कर्णधार: युनूस खान) कामरान अकमल, सलमान बट, शोएब मलिक, वहाब रियाझ, मोहम्मद आमिर, अब्दुल रज्जाक, यासिर अराफत, मिसबाह-उल-हक, युनूस खान, सोहेल तन्वीर, सईद अजमल, इम्रान नझीर, उमर गुल, मोहम्मद हफीज, शाहिद आफ्रिदी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com