Yograj Singh Emotional Statement Goes Viral: भारतीय क्रिकेटर युवराज सिंगचे वडील आणि माजी क्रिकेटर योगराज सिंग त्यांच्या स्पष्ट तसेच वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असतात. विषय क्रिकेट असो किंवा कुटुंबाचा, योगराज त्यांचे म्हणणं परखडपणे मांडतात. नुकतेच व्हिंटेज स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगराज यांनी त्यांना आयुष्यात आलेला एकटेपणा तसंच संघर्षांबाबत उघडपणे भाष्य केलं. "बहुतांश वेळेस घरी एकटा असतो आणि जेवणासाठीही अनोखळी लोकांवर अवलंबून राहावे लागते. घरामध्ये स्वयंपाकी आणि नोकर आहेत, ते जेवण देऊन निघून जातात. मी कोणाकडेही काहीही मागत नाही", असे योगराज यांनी म्हटलं.
"कुटुंबावर खूप आहे": योगराज सिंग
"माझं माझ्या मुलांवर, आई आणि संपूर्ण कुटुंबावर खूप प्रेम आहे, पण माझ्या कोणाकडूनही काहीही अपेक्षा नाहीत" , असंही त्यांनी स्पष्ट केलं.
"...आता देवाची ईच्छा": योगराज सिंग
योगराज यांनी सांगितलं की, "आता आयुष्यामध्ये कोणताही मोह उरलेला नाही. मी मरायला तयार आहे. देवाने मला खूप काही दिलंय. जेव्हा हवंय त्याने मला स्वतःकडे बोलावावे".
कुटुंब मोडल्याने बसला होता मोठा धक्का
पहिली पत्नी आणि मुलं सोडून गेल्यानंतर प्रचंड त्रास होण्यास सुरुवात झाल्याचंही योगराज यांनी मुलाखतीत मान्य केलं. ज्या महिलेसाठी मी माझं संपूर्ण आयुष्य दिलं, ती मला सोडून गेली हा माझ्या खूप मोठा धक्का होता, असे ते म्हणाले. असं नेमके काय घडलं की सर्वजण माझ्यापासून दूर गेले, हे समजलंच नाही, असे सांगत त्यांनी स्वतःला निरपराधही म्हटलंय.
पहिलं लग्न मोडण्याचा आणि मुलं दुरावण्याचा किस्सा
शबनम कौर या योगराज सिंग यांच्या पहिल्या पत्नी आहेत. युवराज आणि जोरावर ही त्यांची दोन आहेत. मतभेदांमुळे योगराज आणि त्याचं पहिली पत्नी विभक्त झाले होते. युवराजनेही एकदा सांगितलं होतं की त्याचे आईवडील नेहमीच भांडत असत, म्हणूनच त्यांना वेगळं होण्याचा सल्ला दिला होता. यानंतर योगराज यांनी दुसरे लग्न केले, मुलं मोठी झाल्यानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली.
"परिस्थिती कितीही कठीण असली तरी पुढे जात राहिलो. क्रिकेट खेळलो, युवीही खेळला, तो पुढे गेला, सिनेमांमध्येही काम केलं, पण शेवटी एकटेपणा तसाच राहिला", अशी खंत योगराज यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केली.
(नक्की वाचा: लेक क्रिकेट जगताचा 'बादशहा'; मात्र सख्ख्या बापाची अन्नासाठी वणवण..., मृत्यूची मागतायेत भीक)