Dhanashree Varma Post : युजवेंद्र चहल-RJ महवशचे फोटो व्हायरल, धनश्री वर्माची पोस्ट चर्चेत, म्हणाली...

Dhanashree Varma post : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमधील आरजे महवशसोबतचे त्याचे काही फोटो व्हायरल झाले. दरम्यान त्याची आधीची पत्नी धनश्री वर्माची एक सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Dhanashree Varma post

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सध्या केवळ त्याच्या खेळामुळेच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अलिकडेच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमधील आरजे महवशसोबतचे त्याचे काही फोटो व्हायरल झाले. दरम्यान त्याची आधीची पत्नी धनश्री वर्माची एक सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

युजवेंद्र चहलसोबत घटस्फोटानंतरही धनश्री वर्मा सतत चर्चेत राहते. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने लिहिले की, 'महिलांना दोष देणे नेहमीच फॅशन राहिली आहे.' ही पोस्ट पाहून लोक विविध अंदाज लावत आहेत. युजवेंद्र चहल आणि आरजे महवश यांच्या फोटोवर तिची प्रतिक्रिया आहे, असा देखील अंदाज लावला जात आहे. 

(नक्की वाचा- घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल 'या' सौंदर्यवतीच्या प्रेमात? दुबईत दिसले एकत्र; कोण आहे मिस्ट्री गर्ल?)

Dhanashree Varma Post

4 वर्षांत नातं तुटलं

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे 2020 मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते. या लग्नात भारतीय क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. लग्नापूर्वी दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. पण लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांचे नाते तुटले आणि दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

(नक्की वाचा- Team India Returnय: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली मुंबईत विजयी मिरवणूक निघणार का? वाचा सर्व माहिती)

घटनस्फोनंतरही चर्चेत

घटस्फोटानंतर दोघे चर्चेत आहेत. युजवेंद्र चहल त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत आहे. धनश्री देखील तिच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहे. मात्र दोघांच्या सोशल मीडियाच्या पोस्ट नेहमीच एकामेकांशी जोडल्या जात आहेत.  

Advertisement

धनश्रीच्या लेटेस्ट पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी म्हटलं की, समाजाने महिलांबद्दलचा आपला विचार बदलला पाहिजे. तर काहींनी तिला आता पुढे जाण्याचा सल्ला दिला. 

कोण आहे ती मिस्ट्री गर्ल?

युजवेंद्र चहलसोबत स्टँडवर बसलेली मुलगी एक यशस्वी युट्यूबर आहे तसेच रेडिओ जॉकी देखील आहे. तिचे नाव आरजे महवाश आहे, ती याआधीही युजवेंद्र चहलसोबत दिसली आहे. जेव्हा या दोघांचा एकत्र फोटो व्हायरल झाला, तेव्हाही लोकांनी असे गृहीत धरले होते की धनश्री वर्मापासून घटस्फोट घेतल्यानंतर चहल आरजे महवाशला डेट करत आहे. मात्र या बातम्यांमघ्ये तथ्य नसल्याचे तिने म्हटले होते. 

Advertisement
Topics mentioned in this article