जाहिरात

IND Vs NZ Final: घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल 'या' सौंदर्यवतीच्या प्रेमात? दुबईत दिसले एकत्र; कोण आहे मिस्ट्री गर्ल?

Yuzvendra Chahal With Mestry Girl: सामना पाहण्यासाठी एका मिस्ट्री गर्लसोबत स्टँडमध्ये बसलेला दिसला, त्यानंतर तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चहलसोबत बसलेली ती सुंदरी कोण? असा सवाल नेटकरी विचारत आहेत. 

IND Vs NZ Final: घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल 'या' सौंदर्यवतीच्या प्रेमात? दुबईत दिसले एकत्र; कोण आहे मिस्ट्री गर्ल?

IND Vs NZ Final Champions Trophy 2025: दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ Champions Trophy Final) यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्याला भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने हजेरी लावली. यावेळी त्याच्यासोबत बसलेल्या एका सुंदर तरुणीने सर्वांचेच लक्ष वेधले. सामना पाहण्यासाठी एका मिस्ट्री गर्लसोबत स्टँडमध्ये बसलेला दिसला, त्यानंतर तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चहलसोबत बसलेली ती सुंदरी कोण? असा सवाल नेटकरी विचारत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्माचा घटस्फोट झाला. चहल आणि धनश्रीच्या नात्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून दुरावा आला होता. अशातच काही दिवसांपूर्वीच दोघांनी कायमचे वेगळे होण्याचा निर्णय घेतला. वैवाहिक आयुष्य संपल्याने चहलला मोठा धक्का बसल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरु होती, अशातच आज दुबईमध्ये एका सुंदर तरुणीसोबत तो फायनल पाहण्यासाठी आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

आता युजवेंद्र चहल कोणत्या मुलीसोबत बसला आहे, ती त्याची प्रेयसी आहे की फक्त मैत्रीण आहे? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. सोशल मीडियावर चहलचे चाहते त्याला असे प्रश्न विचारत आहेत. काही नेटकऱ्यांनी  धनश्री वर्मापासून घटस्फोट घेतल्यानंतर चहल पुन्हा प्रेमात पडला आहे आणि तो या मुलीला डेट करत असल्याचेही म्हटले आहे. 

कोण आहे ती मिस्ट्री गर्ल?

युजवेंद्र चहलसोबत स्टँडवर बसलेली मुलगी एक यशस्वी युट्यूबर आहे तसेच रेडिओ जॉकी देखील आहे. तिचे नाव आरजे महवाश आहे, ती याआधीही युजवेंद्र चहलसोबत दिसली आहे. जेव्हा या दोघांचा एकत्र फोटो व्हायरल झाला, तेव्हाही लोकांनी असे गृहीत धरले होते की धनश्री वर्मापासून घटस्फोट घेतल्यानंतर चहल आरजे महवाशला डेट करत आहे. मात्र या बातम्यांमघ्ये तथ्य नसल्याचे तिने म्हटले होते.