चीनमधून (China News) गेल्या काही महिन्यात वारंवार हिंसक घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी ऑक्टोबरमध्ये बीजिंगमधील एका शाळेजवळ झालेल्या चाकू हल्ल्यात तीन मुलांसह पाच जण जखमी झाले होते.याशिवाय शानडोंग प्रांतातील तैआन शहरातील एका शाळेबाहेर बसने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना धडक दिली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा चीनमधून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चीनच्या पूर्वेकडील वूशी भागात शनिवारी सायंकाळी 21 वर्षीय विद्यार्थ्याने केलेल्या चाकू हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे आणि 17 जणं जखमी झाले आहेत. यिक्सिंग शहरातील वूशी वोकेशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये झालेल्या या हल्ल्यात परिसरात खळबळ उडाली आहे. हा आरोपी त्याच शाळेचा माजी विद्यार्थी आहे. जो पदवीधर होणार होता. मात्र परीक्षेत तो नापास झाला. परीक्षेत नापास झाल्याच्या रागातून मुलाने शाळेच्या परिसरात चाकूने हल्ला केला. या चाकू हल्ल्यात तब्बल 10 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी आहेत.
नक्की वाचा - अरेच्चा हा भारताचा इतिहास माहितीच नव्हता! ब्रिटीश इतिहासकाराने सांगितलेल्या या गोष्टी तुम्हाला माहिती असल्याच पाहीजे
मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेत अपयश, पदवी न मिळणे, इंटर्नशिपसाठी मिळणारा कमी पगार यासर्व गोष्टींमुळे तो नाराज होता. यातूनच विद्यार्थ्याने शाळेतील मुलांवर हल्ला केल्याची माहिती आहे. तरी पोलिसांकडून या प्रकरणावर तपास सुरू आहे.