देवा राखुंडे
इंदापुरात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. श्री नारायणदास रामदास हायस्कूलचा हा विद्यार्थी आहे. तो शाळेत गेला होता. प्रार्थना झाल्यानंतर तो आपल्या वर्गात बसला. त्याच वेळी त्याच्या छातीत दुखू लागले. शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्याला बाहेर मोकळ्या जागेत आणले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. प्रथमेश विकास खबाले असं विद्यार्थ्याचे नाव आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रथमेश हा दहावीच्या वर्गात शिकतो. तो नेहमी प्रमाणे शाळेत आला होता. शाळेच्या प्रांगणात सामूहिक प्रार्थना झाल्यानंतर हा विद्यार्थी वर्गात गेला.त्यानंतर बाकावर बसल्यानंतर त्याला चक्कर आली. शिक्षकांनी त्याला तात्काळ मोकळ्या हवेला आणले. त्या ठिकाणी रिक्षा बोलावून रिक्षा मधून त्याला इंदापूर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तिथे त्याला मृत्यू म्हणून घोषीत करण्यात आले.
ट्रेंडिंग बातमी - जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, मोठं कारण आलं समोर
विद्यार्थ्याला अचानक चक्कर आल्यानंतर संस्थेतील सर्वच शिक्षक त्या विद्यार्थ्याकडे धावले. तो बेशुद्ध अवस्थेत होता. शिक्षकांनी त्याचं हृदय देखील पंपिंग करण्याचा प्रयत्न केला. तात्काळ त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयातही हलवलं. मात्र डॉक्टरांच्या आणि शिक्षकांच्या प्रयत्नांना अपयश आलं. नाही त्याचा रूग्णालयात आणेपर्यंत मृत्यू झाला होता.
ट्रेंडिंग बातमी - कोल्हापूर ते पॅरिस, जग जिंकणाऱ्या मराठमोळ्या स्वप्निलची 'अनटोल्ड स्टोरी'
या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू झाल्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.तर शाळेतील शिक्षकांना देखील अश्रू अनावर झाले. तातडीने संस्थेने शाळेला सुट्टी देखील जाहीर केली आहे. लहान वयात या मुलाला असं अचानक हे जग सोडून जावा लागणं हेच खूप धक्कादायक मानले जात आहे.