जाहिरात

कोल्हापूर ते पॅरिस, जग जिंकणाऱ्या मराठमोळ्या स्वप्निलची 'अनटोल्ड स्टोरी'

महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावातून आलेल्या या तरूणाने आपल्या कामगिरीने संपुर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. हे यश मिळवणाऱ्या स्वप्निलची 'अनटोल्ड स्टोरी'.

कोल्हापूर ते पॅरिस, जग जिंकणाऱ्या मराठमोळ्या स्वप्निलची 'अनटोल्ड स्टोरी'
मुंबई:

स्वप्निल कुसाळे याचे नाव देशातल्या प्रत्येकाच्या तोंडात आहे. त्याचे कारणही तसेच आहे. स्वप्निलने देशाचे नाव रोशन करत सातासमुद्रापार यशाचा झेंडा रोवला आहे. पॅरिस इथे होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने  50 मीटर रायफल थ्री पोझिशनमधील प्रकारात देशाला पदक मिळवून दिले आहे. पण पदक मिळवण्या आधी त्याला करावा लागलेला संघर्ष, त्याची तपश्चर्या, त्याची मेहनत याकडे कानाडोळा करून चालणार नाही. महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावातून आलेल्या या तरूणाने आपल्या कामगिरीने संपुर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. हे यश मिळवणाऱ्या स्वप्निलची 'अनटोल्ड स्टोरी' आपण जाणून घेणार आहोत. 

Latest and Breaking News on NDTV

स्वप्निलचा कुसाळेचा प्रवास

स्वप्निल कुसाळे याचा जन्म कोल्हापूरच्या कांबळवाडीचा आहे. 6 ऑगस्ट 1995 साली त्याचा जन्म झाला. सर्व सामान्य कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील हे शिक्षक आहेत. भाऊ ही शिक्षक आहे.  तर आई कांबळवाडीच्या सरपंच आहेत. स्वप्निलने 2008 मध्ये अभिनव बिंद्राला खेळताना पाहीले. त्यानंतर त्याने निश्चिय केला की आपणही नेमबाज बनायचे. त्याने आपली इच्छा वडीलांना सांगितली. नेमबाजीतही त्याने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन हा प्रकार निवडला. हा खेळ तसा खर्चीक होता. पण मुलासाठी वडीलांनी पाऊल उचललं. 2009 साली नाशिकच्या क्रिडा प्रबोधिनीत दाखल झाला. तेव्हा पासून त्याच्या नेमबाजीला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. तिथेच स्वप्नील घडला. 

Latest and Breaking News on NDTV

बुलेटसाठी पैसेही नव्हते 

नेमबाजीत स्वप्निल आपले हात अजमावत होता. पण हा खेळ तसा खर्चीक होता. नेमबाजाला बंदुकीतल्या बुलेट गरजेच्या असतात. या बुलेट महाग असतात. रायफल आणि जॅकेटचा खर्च हा वेगळा असतो. त्यावेळी एका बुलेटची किंमत 120 रूपये होती. अशा स्थितीत बुलेट घेण्यासाठी स्वप्निलकडे पैसेही नव्हते. त्याचा सरावही त्यामुळे थांबणार होता. मुलाचा सराव थांबला तर मोठे नुकसान होईल. हे लक्षात घेता स्वप्निलच्या वडीलांनी त्यावेळी कर्ज काढले. त्यातून स्वप्निलला सर्व साहीत्य घेवून दिले. रायफलमधील बुलेट महाग असल्याने, त्या तो काळजीने वापरत होता. अशा पद्धतीने त्याचा शुटींगचा श्रीगणेशा झाला. 

Latest and Breaking News on NDTV


आंतरराष्ट्रीय स्पर्धांत चुणूक 

पुढे स्वप्निलने आंतरराष्ट्रीय स्पर्धात चुणूक दाखवायला सुरूवात केली. त्यावेळी लक्ष्य स्पोर्ट्स सारखी संस्था त्याच्या मागे खंबीर पणे उभी होती. प्रत्येक स्पर्धेत त्याच्या मागे सुधारणा होत गेली. 2022 साली झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये त्याने चौथे स्थान पटकवले. ही स्पर्धा त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कारण या स्पर्धेत चौथे स्थान पटकावल्यामुळे त्याला पॅरीस ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळाला. त्याच वर्षी झालेल्या एशियन गेम्समध्ये त्याने सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. तर विश्वचषक स्पर्धेत त्याने तिन पदकं जिंकली. त्यात एक सुवर्ण तर दोन रौप्य पदकाचा समावेश होता. 

Latest and Breaking News on NDTV

धोणी आणि स्वप्निलमधील साम्य 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम.एस.धोणी आणि स्वप्निल यांच्यात अनेक गोष्टीत साम्य आहे. धोणीचा स्वप्नील हा चाहता आहे. धोणी रेल्वेमध्ये टीसीम्हणून कामाला होता. स्वप्निलही रेल्वेमध्ये टीसीम्हणूनच कामाला आहेत. धोणी ज्या पद्धतीने शांत आणि संयमी राहातो तसाच स्वभाव हा स्वप्नीलचा आहे. नेमबाजीमध्ये यश मिळवायचे असेल तर संयमी स्वभाव फायद्याचा ठरतो. त्यामुळे अभिनव बिंद्रा प्रमाणेच धोणीचा स्वप्निल चाहता आहे.  

Latest and Breaking News on NDTV

रायफल थ्री पोझिशन म्हणजे काय? 

स्वप्नीलने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमधील प्रकारात ऑलिम्पिक पदक मिळवलं आहे. खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्रातल्या खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलेला पहिला खेळाडू ठरला आहे. स्वप्नील 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात खेळतो. हा खेळ नक्की कसा खेळला जातो याची विचारणा अनेक जण करतात. थ्री पोझिशन म्हणजे नीलिंग याचाच अर्थ गुडघ्यावर खाली बसणे, प्रोन म्हणजे झोपून आणि स्टँडिंग म्हणजे उभ्याने नेमबाजी करणे. या प्रकारात या तिन्ही पोझिशनमध्ये नेम धरावा लागतो. हा नेमबाजीचा प्रकार इतर नेमबाजी पेक्षा अवघड समजला जातो. 

Latest and Breaking News on NDTV

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
कोल्हापुरच्या स्वप्निल कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मारली बाजी; भारताच्या पदरी तिसरं पदक
कोल्हापूर ते पॅरिस, जग जिंकणाऱ्या मराठमोळ्या स्वप्निलची 'अनटोल्ड स्टोरी'
Paris Olympic 2024 swapnil kusale won bronze medal for india Eknath shinde and Devendra fadanvis called his parent to congratulate them
Next Article
Paris Olympic: स्वप्नील कुसाळेच्या स्वागताचा प्लॅन ठरला, सरकारने जाहीर केले 1 कोटींचे बक्षिस