Badlapur Egg Trafficking Case New Update: बदलापूर शहरात स्त्री बीज विक्री प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचे धागेदोरे राज्यभरात पसरल्याचं समोर आलं. परराज्यातही या प्रकरणाचे कनेक्शन असल्याचं उघडकीस आलं होतं. स्त्री बीज विक्री प्रकरणातील चारही महिला आरोपींना आज अंबरनाथ कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आरोपी सुमित सोनकांबळेला 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.याप्रकरणात आणखी दोन जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की बदलापूर शहरात स्त्री बीज विक्री प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचे धागेदोरे राज्यभरात पसरल्याचं समोर आलं. परराज्यातही या प्रकरणाचे कनेक्शन असल्याचं उघडकीस आलं होतं. नाशिकमध्ये असलेल्या आयव्हीएफ सेंटरच्या कार्यालयाच्या नावाखाली हे भयंकर प्रकरण सुरु होतं.
नक्की वाचा >> मालवण समुद्र किनाऱ्यावर भयंकर घटना, पर्यटकांमध्ये घबराट, थरकाप उडवणारा व्हिडीओ आला समोर, काय घडलंय?
आरोपी महिलांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी
महिला आरोपी सुलक्षणा गाडेकर,अश्वीनी चाबूकस्वार,मंजूषा वानखेडे,सोनोग्राफी सेंटरमध्ये काम करणारी महिला सोनल ग्रेलवाल यांच्यासह फार्मासीस्ट सोनकांबळे याला न्यायालयात हजर केले गेले. महिलांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर फार्मासीस्ट सोनकांबळेला 2 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखीन दोन जणांना अटक होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे.आता या प्रकरणात आणखी कोणाचे नाव उघड होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.