होर्डिंगच्या मालकामुळे 14 जणांचे हकनाक बळी; नववी फेल असलेला भावेश भिंडे कोण आहे? 

घाटकोपर दुर्घटनेनंतर होर्डिंगचा मालक भावेश भिंडे याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

13 मेची संध्याकाळ मुंबईकरांसाठी नवं आव्हान घेऊन आली आहे. घाटकोपर छेडा नगर परिसरातील 120x120 फुटाचं होर्डिंग कोसळल्याने तब्बल 14 जणांचा हकनाक जीव गेला. मुंबईभरात होर्डिंगचं जाळं पसरलेलं आहे. 120 टन वजनाचं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याने 100 दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. आज सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार या दुर्घटनेत तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला, तर 45 जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

या घटनेनंतर होर्डिंगचे संचालक भावेश भिंडे याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजू अॅड्स आणि इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचे संचालक भावेश भिंडे याला लहानपणापासून बिझनेस क्षेत्रात स्वत: नाव कमवायचं होतं. युट्यूबवर एका मुलाखतीत त्याने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. Noting is Impossible असं भावेशच्या कंपनीची टॅग लाइन आहे. भावेशच्या बिझनेसच्या वेडापायी तब्बल 14 जणांचा जीव गेल्याचं म्हटलं जात आहे.   

भावेश भिंडे याचे वडील रिक्षाचालक होते. लहानपणी त्याच्या घरातील परिस्थिती हलाखीची होती. त्याने काही काळ एका अॅड एजन्सीमध्ये ऑफिस बॉयचंही काम केलं होतं. मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. 1993 मध्ये त्याने स्वत:चा होर्डिंगचा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी रेल्वे जाहिरातींचे कॉन्ट्रॅक्ट घेत होती, यासाठी कमिशन देत होती. भावेशने येथूनच आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. त्याने ठाणे, मुलुंड, भांडूप, कुर्ला, कांजूरमार्ग, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, माटूंगा, परेल या भागात आपला व्यवसाय वाढवला. एकाच अॅड एजन्सीने सेंट्रल रेल्वेचा इतका मोठा भाग व्यापल्याचं पहिल्यांदाच घडलं असल्याचं भावेशने स्वत: आपल्या मुलाखतीत सांगितलं. 

नक्की वाचा - घाटकोपर होर्डिंग कोसळल्याच्या घटनेत मृतांचा आकडा वाढला; 14 जणांचा मृत्यूला कोण जबाबदार?

त्याला पैसे कमवायचं आणि ब्रँड तयार करण्याचं वेड होतं. होर्डिंग माध्यम इतर कोणत्याही माध्यमांच्या तुलनेत परवडणारं आणि परिणामकारक असल्याचं मानत त्याने या क्षेत्रात उडी टाकली. भावेशच्या कंपनीच्या होर्डिंगवर कॅमेरा बसविण्यात आल्याचंही त्याने आपल्या मुलाखतीत सांगितलंय. नववी फेल असलेल्या भावेशने बिझनेस कशाच्या आधारे वाढवला असा सवाल उपस्थित केला जात आहे. भावेश भिंडे ब्लॅकलिस्ट असूनही त्याला कॉन्ट्रॅक्ट कसं देण्यात आलं? भावेश भिंडेचा मुलुंड, घाटकोपर स्टेशनवर होर्डिंग घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान भाजप नेते राम कदम यांनी एक फोटो ट्विट करून उद्धव ठाकरेंवर मोठे आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत भावेश भिंडेंचा फोटो ट्विट करीत राम कदम यांनी गंभीर आरोप केले आहेत. 

Advertisement

भावेश भिंडे बेपत्ता...
भावेश भिंडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून राहत्या घरी भावेश भिंडे सापडला नाही, त्याचा मोबाइलही बंद असल्याची माहिती समोर आली आहे. 

Advertisement

Advertisement