धक्कादायक! मुलावर उपचार करा, बाप सांगत राहीला, लेकाचा बेडवरच तडफडून जीव गेला

दरम्यान प्रेमच्या वडीलांनी केलेले आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed

शहापूर उप जिल्हा रूग्णालयात 14 वर्षीय प्रेमचा साप चावल्याने उपचाराअभावी मृत्यू झाला. वडिलांनी आरोग्य व्यवस्थेवर आरोप केला असून, रुग्णालय प्रशासनाने मात्र उपचार केले असल्याचा दावा केला आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव गंभीर मुद्दा आहे.

आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
शहापूर:

भूपेंद्र अंबवणे 

Shahapur News: शहापूर उप जिल्हा रूग्णालयातली आरोग्य व्यवस्था किती तोकडी आणि ढिसाळ आहे हे समोर आला आहे. तसा आता आरोपही केला जात आहे. इथं एका 14 वर्षाचा मुलाचा बेडवर तडफडून मृत्यू झाला. रुग्णालयात आणून ही वेळेत योग्य उपचार मिळाले नाहीत म्हणून त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाच्या वडीलांनी केला आहे. याला रुग्णालय प्रशासन आणि त्यांची यंत्रणा जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. शिवाय उपचार केल्याचा दावा ही केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रेम लहानु सदगीर हा शहापूर तालुक्यातला पेंढरघोळ गावचा राहाणारा होता. तो 14 वर्षांचा होता. क्रिकेट खेळण्यासाठी तो बाहेर गेला होता. त्यावेळी झाडीत गेलेला बॉल आणण्यासाठी तो गेला होता. त्यावेळी त्याला साप चावला. ही गोष्ट त्याला लक्षात आली. तो तातडीने घरी गेला. वडीलाना ही गोष्ट सांगितली. वडीलांनी ही लगेच दुचाकीवरून त्याला शहापूर उप जिल्हा रूग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्याच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर कोणतेच उपचार करण्यात आले नाही असा आरोप प्रेमच्या वडीलांनी केले आहेत. उलट सर्व तपासण्या नॉर्मल आल्या आहेत असं सांगण्यात आलं. असं ही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - ऑस्ट्रेलियात पाठवतो सांगून इराणला उतरवले, 'त्या' 3 तरुणांबरोबर तिथेच भयंकर घडले

रुग्णालयात कोणतेही उपचार दिले जात नव्हते. त्यावेळी आपल्या मुलावर उपचार करा अशी विनवणी आपण करत होतो. पण आपल्याकडे कुणही लक्ष दिले नाही. आपण विनंती करत राहीलो, त्याच वेळात मुलाचा रुग्णालयाच्या बेडवरच तडफडून मृत्यू झाला, असा आरोपही त्यांनी केला आहे. याला रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचं ही ते म्हणाले. आपल्या डोळ्या समोर आपला एकूलता एक लेक गेला. प्रेमला वेळेत उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचला असता. शहापूर तालुका हा दुर्गम आहे. अनेक वेळा इथं सर्पदंशाच्या घटना घडतात. पण योग्य उपचारा अभावी त्यांना जीव गमवावा लागल्याची अनेक प्रकरणे या आधी ही झाली आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - Home Buying: घर खरेदी करताय? मग ही बातमी नक्की वाचा अन् वाचवा लाखो रुपये

दरम्यान प्रेमच्या वडीलांनी केलेले आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळले आहेत. ज्यावेळी पेशंट रुग्णालयात आला त्यावेळी तो चालत आला होता. त्याला साप चावल्याचं आम्हाला सांगण्यात आलं होतं. लगेचच त्याला अॅडमिट केलं देलं.  दहा मिनिटात उपचार सुरू केले असा दावा वैद्यकीय प्रभारी अधिकारी डॉक्टर आशिष शिंदे यांनी केला आहे. त्याचे रिपोर्ट ही नॉर्मल आले होते. पणनंतर त्याची तब्बेत बिघडली. त्याला इंजेक्शन देण्यात आलं. पीसीआर ही दिला गेला. पण त्याचा जीव वाचला नाही असा स्पष्टी करणही डॉक्टर आशिष शिंदे यांनी दिलं आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Navi Mumbai News: पावसामुळे भाजीपाल्याचा तुटवडा, किरकोळ बाजारात भाज्या महागल्या, पाहा आजचे दर

जर रुग्ण स्वत:च्या पायावर चालत आला होता, तर मग त्याचा मृत्यू कसा काय झाला? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तो एक तास रुग्णालयात बेडवर पडून होता. रुग्णालय प्रशासन जर आपण वेळेत उपचार केले असं सांगत असेल तर मग असा काय झालं की त्यामुळे 14 वर्षाच्या प्रेमचा जीवच गेला. या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नाहीत, असा आरोपही होत आहे. त्यामुळेच रुग्णांना आपला जीव गमवण्याची वेळ येत आहे. शहापूर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रूग्णालय, उप जिल्हा रूग्णालय अशी रुग्णालय तर आहेत. पण त्यात तज्ज्ञ डॉक्टरच नाहीत असं ही बोललं जातंय.