अमोल गावंडे
काही महिन्यांपूर्वी बदलापूर येथील अत्याच्याराच्या घटनेनं संपुर्ण महाराष्ट्रा हादरला होता. त्यानंतर या घटना कमी होतील अशी अपेक्षा होती. पण त्या कमी होण्या ऐवजी जास्त वाढत चालल्या आहेत. पुणे,कल्याण, अकोला अशा एका मागून एक अत्याचाराचा घटना समोर येत आहेत. त्यामुळे अशा नराधमांवर कोणाचा वचक आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण केले जात आहेत. त्यात कहर म्हणून की काय बुलढाण्यात एक भयंकर घटना समोर आली आहे. ही घटना म्हणजे विकृतीचा कळस म्हणावी लागेल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये सर्वांना हादरून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका 14 वर्षीय दिव्यांग अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्यात आले आहेत. गुरुवारी ही घटना उघडकीस आली. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. बुलढाणा जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून अवैध व्यवसाय होत आहेत. त्यातून अनेक गन्हेगारी प्रवृत्तीचे लोक इथं मोकाट सुटले आहेत. त्यातून गुन्हेगारीही वाढत आहे असा आरोप होत आहेत.
त्यातूनच ही घटना घडली आहे. बुधवारी एका 14 वर्षीय दिव्यांग असलेल्या अल्पवयीन मुलावर दोघा नराधमांकडून दारूच्या नशेत अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. ही बाब पिडीत अपंग मुलाने आपल्या आईला सांगितली. त्यानंतर त्याचं कुटुंब हे ऐकून हादरून गेले. त्यांनी तातडीने खामगाव शहर पोलीस स्टेशन गाठून तेथे तक्रार नोंदवली. पोलिसानीही तातडीने कारवाई करत गुन्ह्याची नोंद केली. शिवाय आरोपींनी शोधण्यासाठी पथक तयार केलं.
पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. त्यांना शहर आणि परिसरात शोधण्यात आलं. पिडीत मुलांने त्यांचे वर्णन सांगितले होते. त्यावरून पोलिसांनी दोन्ही नराधमांना ताब्यात घेतले आहे. स्वप्नील गावरगुरु वय 29 आणि आशिष शिंदे वय 35 असे या नराधमांची नावे आहेत. त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांची चौकशी केली जात आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे.